प्रस्थापित अकलूजकरांची त्रिमूर्तींनी अकलूज नगर परिषद निवडणुकीत अक्कल लुज केली…

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊ, रणजीतदादा, रामभाऊ यांच्या राजकीय रणनीतीने प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळणार…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या राजकीय रणनीतीने प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. निश्चितपणे प्रस्थापितांचे मनसुबे धुळीला मिळणार. नेत्यांसह कार्यकर्ते वायबल झालेले आहेत. सोशल मीडिया व समाज माध्यमातून विकासात्मक मुद्दे बाजूला ठेवून वैफल्यग्रस्त नेते व कार्यकर्ते करीत आहेत. यावरून प्रस्थापित अकलूजकरांची त्रिमूर्तींनी अकलूज नगर परिषद निवडणुकीत अक्कल लूज केली, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.
अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदमध्ये रूपांतर झाल्यापासून पहिल्यांदाच अकलूज नगर परिषदेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. भारतीय जनता पार्टी विरुद्ध आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांची समोरासमोर लढत होण्याची शक्यता आहे. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी अकलूज नगर परिषदेची पूर्वतयारी अनेक महिन्यांपासून सुरू केलेली आहे. अकलूजमध्ये प्रत्येक घरात, गल्लीत, वार्डात भाजपचा निष्ठावान व कट्टर कार्यकर्ता निर्माण केलेला आहे. अकलूजमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात आजपर्यंत विरोध होत होता. मात्र, विरोधकांची म्हणावी अशी राजकीय ताकद निर्माण होत नव्हती. त्यामुळे प्रस्थापितांना आजपर्यंत एकहत्ती सत्ता मिळाली आहे. एकाधिकार व दडपशाही यामुळे शहराचा विकास म्हणावा तसा झालेला नाही परंतु, अकलूजकर ग्रामस्थ व मतदार यांना पर्याय नसल्याने आजपर्यंत सहन केलं मात्र, मतदारांचा दिवस उजाडलेला आहे. निश्चितपणे त्रिमूर्तींच्या राजकीय रणनीतीने प्रस्थापित अकलूजकरांच्या सत्तेला सुरुंग लागून राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागणार असल्याची अकलूजकरांमधून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



