रविवारी सुट्टी दिवशी सुद्धा उमेदवारी अर्ज भरले जातील राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय…..

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्रे संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत संगणक प्रणालीवर बाहेर येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोगाने दि. 15/11/2025 ते दि. 17/11/2025 या कालावधीमध्ये तिन्ही दिवस रविवार दि. 16/11/2025 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दिसतील. दररोज सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच पारंपारिक ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपले नामनिर्देशन पत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील, असे राज्य निवडणूक आयोग सचिव सुरेश कांकाणी यांनी आदेश करून सर्व संबंधित जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



