ताज्या बातम्याराजकारण

शिक्षक पुढारी यांना टी एन शेशन त्यांच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागणार….

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांची करडी नजर असणार आहे…

अकलूज (बारामती झटका)

निवडणूक आयोगाने कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार व मतदार यांच्यासाठी आदर्श आचारसंहितेचे नियम पहिल्यापासून आहेत. मात्र, खऱ्या अर्थाने टी एन शेशन यांच्या कारकिर्दीमध्ये आदर्श आचारसंहिता काय असते, याचा प्रत्यय आलेला आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरे यांची करडी नजर असणार आहे. शिक्षक पुढारी त्यांना टी एन सेशन यांच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. आचारसंहितेचे पालन न केल्यास कायमचे घरी जावे लागणार आहे, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे..

प्रस्थापित राजकारणी यांनी आजपर्यंत सत्तेचा गैरवापर करून शासकीय सेवेतील विशेष करून शिक्षक पुढारी यांचा शासकीय सेवेत रुजू असलेले व खाजगी संस्थाचालकांनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे. पुढारी शिक्षकांना निवडणुकीची घरोघरी पत्रके वाटणे, प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी होणे, सभेमध्ये उपस्थित राहणे अशा पद्धतीची बेकायदेशीर कृती सुरू होती. याला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विशेष करून माळशिरस तालुक्यात अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत टी एन शेषन यांच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन पुढारी शिक्षकांना करावे लागणार आहे.

सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने पुढारी शिक्षकांचा फोटो संबंधित विभागाकडे गेल्यानंतर आचारसंहितेच्या भंगाची कारवाई होऊन कायमचे घरी बसावे लागणार आहे.

त्यामुळे अकलूज नगरपरिषद निवडणुकीत शिक्षक पुढारी नेहमीप्रमाणे वापरायला न मिळाल्याने प्रस्थापितांची गोची होणार आहे. काही पुढारी शिक्षकांना जुलमाने इच्छा नसताना सुद्धा निवडणुकीत पत्रके वाटणे, सभेला उपस्थित राहणे, पद यात्रेला जाणे अशा पिडीत पुढारी शिक्षकांना सुध्दा जयाभाऊ यांच्यामुळे मोकळा श्वास घेण्याची संधी मिळणार आहे. तर राजकीय पुढार्‍यांच्या गळ्यातील ताईत असणारे पुढारी शिक्षक यांची हवा टाईट होणार आहे….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom