ताज्या बातम्याराजकारण

अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक पाच ब मधून सयाजीराजे मोहिते पाटील व अमोल माने आमने-सामने….

अकलूज नगर परिषदेमध्ये राजाविरुद्ध प्रजा अशी लक्षवेधी लढत पाहावयास मिळणार…

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. अकलूज ग्रामपंचायतीवर शिवरत्नवरील मोहिते पाटील यांच्या परिवारांची एक हाती सत्ता राहिलेली आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक लागलेली आहे. मोहिते पाटील यांचे अकलूज मधील असणारे वास्तव्य पाटीलवाडा ज्या प्रभागामध्ये आहे, त्या पाच नंबर प्रभागामध्ये सयाजीराजे मोहिते पाटील विरुद्ध अमोल माने अशी लक्षवेधी लढत लागलेली आहे. राजाविरुद्ध प्रजा अशी लढत होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते अकलूज नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग पाच ब मधून सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील पूर्वी पार व्यवसाय बैलांच्या पायात नाल तथा पत्र्या मारण्याचा व्यवसाय माने परिवाराचा आहे. त्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतो. आपल्या मिळालेल्या कष्टाच्या उत्पन्नातून गोरगरीब जनतेची सेवा माने परिवार करीत आहेत. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी स्वतः अनुभवलेल्या असल्याने इतरांच्याही अडचणीचा अनुभव त्यांना आहे. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी जनतेची सेवा करण्याचा निर्धार करून भाजप व महायुतीकडून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आजपर्यंत केलेल्या जनतेच्या सेवेच्या आशीर्वादावर निवडणुकीमध्ये उभा आहेत. जनता तथा प्रजा अमोल माने यांना सहकार्य करीत असल्याचे चित्र अकलूज नगर परिषदेत जाणवत आहे..

अमोल बाळकृष्ण माने वयाच्या पंधराव्या वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहेत. जनतेने अमोल यांच्या कामातून आजपर्यंत अनुभवले आणि पाहिलेही आहे.

अमोल माने स्वतः गरीब कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत. आणि त्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित केली, गोरगरिबांना कागदपत्रांची कायमच अडचण असते अशा अडचणीतील लोकांना रेशनकार्ड वाटपाची व्यवस्था केली, सर्वसामान्य, गोरगरीब, अशिक्षित, अज्ञानी लोकांच्या घरातील कोणी आजारी आहे, त्यांच्या परिवारात कोणी कर्ता माणूस व पुढे होऊन पाहणारे कोणी नसल्यास त्यांच्या सर्व शासकीय योजनांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची जबाबदारी घेतली.

निसर्गाने खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या कोरोना काळात गोरगरीब जनतेपर्यंत धान्य वाटप केले, भटक्या समाजातील नागरिकांसाठी किराणा साहित्य तसेच त्यांच्या जनावरांसाठी चाऱ्याची सोय केली. गटार, रस्ते, विद्युत समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहे.

कोणत्याही समाजातील वयस्कर आजी-आजोबांनी मदतीसाठी फोन केला की, त्यांच्या घरी जाऊन समस्या ऐकून त्यावर योग्य उपाय केले. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात गरीब कुटुंबांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी मदत केली.

फक्त एवढेच नव्हे तर तहसील कार्यालयापासून कलेक्टर कार्यालयापर्यंत जनतेच्या अडचणी मांडून त्या सोडवण्यासाठी काम केले आहे. अकलूज परिसरातील प्रत्येक भागात कार्य केले असून, इथल्या जनतेला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे त्यांना अनुभवातून माहिती आहे, यासाठी कोणाकडून सांगण्याची गरज नाही.

सामाजिक कार्य करत असल्याने नेहमी समाजसेवक म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत असणारे सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील होतकरू व तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता, प्रजा म्हणून पाठीशी राहणार असल्याच्या भावना प्रभागांमधून बोलल्या जात आहे..

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूजचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील, यांच्या विचाराची अकलूज ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता राहिलेली आहे. सर्वांची ताकद सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या पाठीशी आजोबा, वडील, चुलते, बंधू असे अष्टप्रधान मंत्रिमंडळासारखे घराण्यातील मातब्बर मंडळी यांचा आशीर्वाद राहणार आहे. सयाजीराजे मोहिते पाटील यांना राजे संबोधले जाते. तर अमोल माने सर्वसामान्य जनतेतील प्रजा असल्यासारखे आहेत. त्यामुळे अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये राजा विरुद्ध प्रजा अशी निवडणूक लागलेली आहे. अमोल माने यांना दाढी आहे. मोहिते पाटील आणि दाढी याचा अनुभव पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये घेतलेला आहे. 2009 ची पुनरावृत्ती 2025 ला होईल का ?, अशीही राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom