ताज्या बातम्याराजकारण

कुजय याच्या राजकीय कुबुद्धीमुळे भविष्यात राजकीय कारकीर्द कुजणार…

अकलूज (बारामती झटका)

राजकारण आणि व्यवसाय ह्या दोन समांतर रेषा आहेत. व्यावसायिक माणसाने राजकारणाचा अनुभव, गंध नसणाऱ्या व्यक्तीने राजकारणात हस्तक्षेप केला तर राजकारण वेगळ्या वळणावर जात असते. एखाद्याची कुबुद्धी भविष्यात राजकीय कारकीर्द कुजवणारी ठरत असते, असेच प्रकार राजकारणामध्ये पाहावयास मिळत आहेत. महाभारतामध्ये आपण कुरुक्षेत्रावर पाहिले आहे, सारथ्य कोण करीत आहे यावर विजयाचे गणित ठरत असतं. अर्जुनापेक्षा कर्ण कितीतरी श्रेष्ठ असतो मात्र, अर्जुनाचे सारथ्य श्रीकृष्णाने केलेले आहे. त्यामुळे कर्ण सुद्धा युद्धामध्ये पराजित झालेला पाहिले आहे. सध्याच्या राजकारणात सुद्धा अनेकांचे सारथ्य करुन अनेकांचे राजकीय रथ कोलमडायला लावणारे सारथी राजकारणात व्यावसायिक, राजकारणी यांच्या रथाचे सारथ्य करीत असतील तर निश्चितपणे भविष्यात राजकीय कारकीर्द अंधकारमय होणार आहे. राजकारणामध्ये राजकीय डाव प्रति डाव प्रतिस्पर्धींना वापरले जातात. मात्र, स्वकीयांमध्येच डावपेच करणारे विजय पेक्षा कुजय असतील तर निश्चितपणे भविष्यातील राजकीय वाटचाल कुबुद्धीमुळे कुजणार. अशा आजपर्यंतच्या महाभारतामधील गोष्टी समोर येत आहेत.

जग एकविसाव्या शतकात चंद्रावर गेले तरीसुद्धा पौराणिक अध्यात्मिक गोष्टी आज सुद्धा खऱ्या ठरत आहेत. जर राजकारणामध्ये असा कुठे प्रकार असेल तर योगायोग समजावा….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom