ताज्या बातम्यासामाजिक

दहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना केली अटक

अकलूज उपविभागीय गुन्हे विशेष पथकाची धडक कामगिरी

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस पोलीस ठाणे गु.र.नं. २३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १०९,४९,१८९(२),१९१(२),१९३(३),१९०, शस्त्र अधि.क. ४,२५ वाढीव अ.जा.अ.ज. प्र.अ.१९८९ सुधारणा २०१५ चे क.३(१) (आर) (एस), ३(२) (व्हि) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी 1) संजय साहेबराव नरूटे रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर 2) विनोद विलास आरडे, रा. तिरवंडी, ता. माळशिरस, जि. सो. सध्या रा. काटी, ता. इंदापुर, जि. पुणे हे गुन्हा दाखल झाल्यापासून अटक चुकविण्यारिता स्वतःला लपवत होते. वारंवार पोलिसांना गुंगारा देत होते.

विशेष पथकास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार यातील आरोपी मागील काही दिवसांपासून माळशिरस परिसरात वास्तव्य करत असल्याचे समजले.

यानंतर विशेष पथकाने मिळालेल्या माहितीची पडताळणी करून तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे विशेष पथकातील सहा. फौजदार/गणेश निंबाळकर, पोलीस नाईक राकेश लोहार, नातेपुते पोलीस ठाणे पोका / प्रसाद सूर्यवंशी, अकलूज पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी यांनी केली आहे.

विशेष पथकाने 10 महिन्यांपासून फरार झालेल्या आरोपीस अटक करून एक प्रशंसनीय कामगिरी केली आहे. भविष्यातही अशा प्रलंबित आणि फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom