ताज्या बातम्याराजकारण

“चर्चा तर होणारच” विजय चौकाला गतवैभव प्राप्त करून आठवडा बाजार पुन्हा जुन्या अकलूज शहरात सुरू होणार – माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमीरे.

“मतदारांचा कानोसा” पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप व महायुतीचे अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचार सभेनंतर मतदारांच्या भावना व आशावाद व्यक्त केला जातोय….

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांचा अकलूज येथील सुप्रसिद्ध विजय चौक या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झालेला होता. त्यावेळेस माजी सनदी अधिकारी श्री. शैलेश कोतमीरे यांनी उपस्थित ग्रामस्थ व मतदारांना मार्गदर्शन करताना, विजय चौकाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आठवडा बाजार पुन्हा जुन्या अकलूज शहरात सुरू करून जुने एसटी स्टँड विकसित करून अकलूजचा पुन्हा नव्याने व्यापार व दळणवळणासाठी उपयोग होणार असल्याचे सांगितले. याची अकलूज पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

विजय चौक परिसरात व अकलूजची शिवापूर पेठ म्हणजे पूर्वीच्या काळची पुण्यातील लक्ष्मी रोड वरील व्यापारी पेठ होती. एसटी स्टँड व आठवडा बाजार शहराच्या बाहेर नेल्याने शिवापूर पेठ व आसपासच्या व्यापारी व स्थानिक नागरिक यांची कुचंबना होत होती. प्रस्थापितांच्या आडमुठ्या धोरणामुळे नाईलाज होता. प्रचार शुभारंभानंतर शिवापूर पेठेतील व विजय चौकातील आसपासच्या मतदारांचा व व्यापाऱ्यांचा कानोसा घेतल्यानंतर माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमिरे यांच्या भाषणावरून व्यापारी व स्थानिक नागरिक मतदार यांच्या भावना व आशावाद व्यक्त केला जातोय. त्यामुळे विजया चौकाचे गतवैभव हीच खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.

केंद्रात नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यात देवाभाऊ, जिल्ह्यात जयाभाऊ, तालुक्यात रामभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी मूलभूत सुविधा त्यांच्यासाठी भरपूर व भरघोस निधी मिळणार आहे. यासाठी भाजप व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. पूजा करण कोतमीरे व 13 प्रभागातील 26 उमेदवारांच्या कमळ व धनुष्यबाण चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन प्रचार शुभारंभ प्रसंगी अभ्यासपूर्ण भाषणामध्ये माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमीरे यांनी अकलूजकर मतदारांना आवाहन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom