ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री यल्लमा देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार दि. २ डिसेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेच्या निमित्ताने मंगळवार दि. २ रोजी रात्री ठीक साडे आठ वाजता पुजाऱ्याने मानकऱ्यास रुखवत देण्याचा कार्यक्रम, बुधवारी दि. ३ रोजी यात्रेस आलेले भाविक व ग्रामस्थांचा देवीस महानैवद्य व रात्री ठीक नऊ वाजता मानकऱ्याकडून पुजाऱ्यास रुखवत देण्याचा कार्यक्रम, तसेच याच दिवशी रात्री आठ वाजता प्रेक्षकांसाठी ‘स्वप्न सुंदरी ऑर्केस्ट्रा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. यादिवशी रात्री शोभेचे दारूकामही होईल. तर गुरुवारी दि. ४ रोजी सकाळी देवीचा सवाद्य छबीना निघणार आहे. तर दुपारी बारा वाजता कीच तुडवण्याचा कार्यक्रम होईल. याच दिवशी दुपारी दोन वाजता नामवंत मल्लांच्या कुस्त्याने या यात्रेचा समारोप होणार आहे.

याशिवाय यात्रा काळात दररोज संध्याकाळी देवीचा सवाद्य छबीना निघणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक, यात्रेकरू व ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रेसाठी येणाऱ्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांच्या वतीने बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी सर्व भाविकभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



