धैर्यशीलभैयांनी वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली, जनतेसाठी ? का कर्माची फळे ?, आत्मपरीक्षण करावे – अकलूजकर..

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, या पंक्तीचा प्रत्यय, ईश्वराच्या ठिकाणी फक्त देवाभाऊ अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू..
विझताना दिवा फडफडतो, याचाच प्रत्यय काका-पुतण्यांच्या विजय चौकातील भाषणाचा सर्वसामान्य जनतेसह राजकीय नेत्यांच्यामध्ये चर्चेला..
अकलूज (बारामती झटका)
अकलूज नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची विजय चौकामधील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील व माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाषणाची चर्चा सुरू आहे. धैर्यशीलभैय्या यांनी भाषणामध्ये अनेक मुद्दे घेतलेले होते. त्यामध्ये वेळ प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली, असे सांगत असताना माढा लोकसभा, सोलापूर जिल्हा, माळशिरस तालुका व अकलूजच्या जनतेसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवलेली आहे. या वाक्याचे आत्मपरीक्षण करावे, असे अकलूजकरांमधून सूर उमटत आहेत. जेलमध्ये जाण्याची तयारी जनतेसाठी ?, का केलेल्या कर्माच्या फळासाठी ?, याचे आत्मपरीक्षण करण्याची राजकीय वर्तुळात व अकलूजकरांमध्ये चर्चा सुरू आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या पंक्तीचा प्रत्यय, ईश्वराच्या ठिकाणी फक्त देवाभाऊ अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विझताना दिवा फडफडतो याचा प्रत्यय काका-पुतण्याच्या विजया चौकातील भाषणांचा सर्वसामान्य जनतेसह राजकीय नेत्यांमध्ये विषय चर्चिला जात आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारावर अकलूजकर जनतेने कायम राजकीय व व्यक्तिगत मोहिते पाटील यांच्यावर प्रेम केलेले आहे. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये अकलूजकर जनता त्रस्त होती, नाईलाज होता. पर्याय नसल्याने त्रस्त अकलूजकर यांनी सहन केलेले आहे. तालुक्यात व जिल्ह्यात महसूल, पोलीस व कोणत्याही प्रशासनामध्ये अधिकारी शिवरत्न या ठिकाणी भेट देऊन मगच कार्यालयाकडे जात असत, हीच पद्धत एक वर्षापासून बदललेली आहे. सध्या पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी शिवरत्न बंगला व मोहिते पाटील विरोधी गटाकडून येत आहेत, याचाही मनामध्ये राग व खंत असावी. याचाही प्रत्यय भाषणांमधून रागाने व जोशात तावातवाने बोलण्यातून व्यक्त होत होता. अकलूज व तालुक्यातील जनतेची आर्थिक पिळवणूक पोलीस स्टेशन, कोर्ट, कचेरी अशा वेगवेगळ्या कारणाने होत होती. कितीतरी लोकांवर जाणीवपूर्वक व राजकीय हेतूने अन्याय केलेली जनता आता मुक्त झालेली आहे. याचाही मनामध्ये राग असावा, असा बोलण्यातून ओघ होता. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आजपर्यंत कितीतरी लोकांवर अन्याय, अत्याचार, दडपशाही केलेली आहे. हे सर्व लोक सध्या सत्ता परिवर्तन करण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
माळशिरस तालुक्यामध्ये माजी आमदार राम सातपुते खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आधारवड बनलेले असल्याने अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये चित्र पहावयास मिळत आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही जेलमध्ये जात नाही तर, गोरगरिबांचे संसार उध्वस्त करून लेकरा-बाळांच्या तोंडातील घास हिरावलेला आहे. अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागलेले आहे. अनेकांचे कोर्ट कचेरी सुरू आहे. या सर्वांचा आशीर्वाद म्हणून कदाचित तुमच्या तोंडातील वेळप्रसंगी जेलमध्ये जाईन ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल, अशी पिढीत जनतेतून चर्चा सुरू आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र, जयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील काका-पुतणे यांच्या विजय चौकातील भाषणाची चर्चा अकलूजसह तालुक्यात सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



