लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते यांची एकच “फाईट” अकलूज नगर परिषदेचे वातावरण “टाईट “

जयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. उत्तमराव जानकर यांच्या टीकेला उत्तर देऊन विरोधी गटाची केली बत्तीगुल, परिवर्तनासाठी गर्दी झाली हाऊसफुल…
“लाव रे तो व्हिडिओ” असे म्हणत वास्तवमध्ये घडलेल्या घटनेचे दर्शन विजय चौकातून संपूर्ण अकलूज माळेवाडी नगरपरिषद हद्दीतील मतदारांना विरोधकांची पोलखोल केली..
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूज ग्रामपंचायतची ओळख होती. अकलूज ग्रामपंचायतचे नगर परिषद मध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे. भाजप व महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय व लहुजी शक्ती सेना अशा तीन गटासह महाराष्ट्र विकास सेना वंचित बहुजन आघाडी, यांच्याबरोबर अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत.

भाजप व महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ विजय चौक येथून झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार प्रचाराचा शुभारंभ पाटील वाडा येथून झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय व लहुजी शक्ती सेना प्रचाराचा शुभारंभ अकलाई देवीला श्रीफळ वाढवून झाला. प्रचाराची रणधुमाळी सर्व पक्षाकडून सुरू आहे. रॅली, कॉर्नर बैठका, प्रचार सभा यामधून राजकीय पक्षांच्या टीकाटिप्पणी सुरू आहे. भाजप व महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या प्रचार सभेमधून एकमेकांवर राजकीय टीकाटिपणी होत असताना प्रचाराची पातळी घसरलेली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या विजय चौकातील प्रचार सभेत जयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. उत्तमराव जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, राम सातपुते, माने पाटील यांच्यासह अनेकांवर टीकेची झोड उडवलेली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची सभा संपल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी दुसऱ्या दिवशी सभेचे आयोजन करून सोशल मीडियावर करारा जबाब मिलेगा, हे वाक्य टाकून प्रचाराची सांगता सभा विजय चौक येथे घेतलेली होती. जयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांच्या टीकेला उत्तर देऊन विरोधी गटाची बत्ती गुल केलेली होती. परिवर्तनासाठी अकलूजकरांची गर्दी हाउसफुल झालेली होती. लाव रे तो व्हिडिओ, असे म्हणत वास्तवमध्ये घडलेल्या घटनेचे दर्शन विजय चौकातून संपूर्ण अकलूज माळेवाडी नगरपरिषद हद्दीतील मतदारांना विरोधी गटाची पोलखोल केलेली असल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची एकच फाईट अकलूज नगर परिषदेचे वातावरण टाईट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.


माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ. संस्कृतीताई राम सातपुते, माजी सनदी अधिकारी शैलेश कोतमीरे, माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती राजलक्ष्मी माने पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाषणामध्ये विरोधी गटाच्या नेते व कार्यकर्त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेले आहे.
माजी आमदार राम सातपुते यांनी टीकेला उत्तर देऊन प्रस्थापितांनी आजपर्यंत अकलूजचा कशा पद्धतीने विकास रखडवला होता याची चित्रफित दाखवून भविष्यामध्ये भाजप व महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पूजा करण कोतमिरे व 13 प्रभागातील 26 उमेदवारांना विजयी केल्यानंतर कशा पद्धतीने विकसित अकलूज असेल याचीही चित्रफीत उपस्थितांच्या समोर ठेवलेली होती. टीव्ही चॅनल व youtube चॅनलच्या माध्यमातून सभेच्या ठिकाणी न येता अनेकजण घरामध्ये, चौकामध्ये, बंगल्यामध्ये बसून पाहत होते. टीका करणाऱ्यांचं उसन ठेवलं नाही, फेडून टाकलं.


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय व लहुजी शक्ती सेनेच्या उमेदवारांवर अथवा अजितदादा पवार, धवलदादा यांच्यावर भाजप व महायुतीकडून केसभर ही टीका झाली नाही, याचीही चर्चा उपस्थितांमधून होत होती. जरी भाजप महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले असले तरीसुद्धा भाजप व महायुतीने आपलाच घटक पक्ष आहे, असे समजून मैत्रीपूर्ण लढत धरली असावी, अशी ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र जयसिंह मोहिते पाटील यांनी कॉर्नर बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाला भाजपचीच बी टीम असे संबोधले होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



