ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूज नगर परिषद निवडणुकीत 34 हजार 804 मतदार मतदानाचा हक्क बजावणार…

13 प्रभागासाठी 39 मतदान केंद्रे, पाच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवकांचे भवितव्य मतदार ठरवणार…

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच अकलूज नगर परिषदेची निवडणूक आज दि. 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने अकलूज शहरांमधील 13 प्रभागांसाठी एकूण 39 मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अकलूज नगर परिषद स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याकारणाने सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आलेली आहे.

अकलूज नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीमध्ये 5 नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती मधील महिला उभ्या राहिलेल्या आहेत तर 13 प्रभागातील 26 नगरसेवक पदांसाठी उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवकांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत..

अकलूज नगर परिषदेमध्ये 13 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागांमध्ये 03 मतदान केंद्र आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 1491 स्त्री 1449 एकूण 2940 मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 2 पुरुष 1124 स्त्री 1089 एकूण 2213, प्रभाग क्रमांक 3 पुरुष 1181 स्त्री 1198 एकूण 2379, प्रभाग क्रमांक 4 पुरुष 1796 स्त्री 1771 एकूण 3568, प्रभाग क्रमांक 5 पुरुष 1587 स्त्री 1675 एकूण 3262, प्रभाग क्रमांक 6 पुरुष 1424 स्त्री 1318 एकूण 2744, प्रभाग क्रमांक 7 पुरुष 1292 स्त्री 1430 एकूण 2724, प्रभाग क्रमांक 8 पुरुष 1158 स्त्री 1102 एकूण 2261, प्रभाग क्रमांक 9 पुरुष 1467 स्त्री 1524 एकूण 2993, प्रभाग क्रमांक 10 पुरुष 1165 स्त्री 1195 एकूण 2360, प्रभाग क्रमांक 11 पुरुष 1040 स्त्री 1064 एकूण 2108, प्रभाग क्रमांक 12 पुरुष 1276 स्त्री 1238 एकूण 2514, प्रभाग क्रमांक 13 पुरुष 1204 स्त्री 1137 एकूण 2342 असे मतदार आहेत.

अकलूज नगर परिषदेसाठी एकूण 39 बूथ मध्ये पुरुष 17,205 महिला 17,190 इतर 13 असे 34408 मतदार आपले हक्क बजावणार आहेत. अकलूज नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी बनसोडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा अकलूज नगर परिषद मुख्याधिकारी सचिन पाटील काम पाहत आहेत.

अकलूज उपविभागीय पोलीस श्री. संतोष वाकसे व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom