ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे एक लाख मे. टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण…

कारखानदारीच्या स्पर्धेच्या युगात श्री शंकर सहकारी साखर कारखाना तग धरून उभा आहे…

सदाशिवनगर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर या कारखान्याचे एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखाना परिवार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कमी कालावधीमध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे एक लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यासाठी दिवस रात्र कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम केलेले आहे.

कारखाना व्यवस्थापनावर विश्वास ठेवून शेतकरी सभासदांनी ऊस गाळपासाठी पाठवत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सभासद ऊस उत्पादक कारखान्यास ऊस पाठवत आहेत. विना अडथळा उसाचा पुरवठा करणारे तोडणी वाहतूक कंत्राटदार मजुर व्यापारी यांचे कारखाना प्रशासनाने अभिनंदन केलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची कोंडी केली आहे. माळशिरस तालुक्यातील फलटण, बारामती, आटपाडी, माढा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने 2900 ची पहिली उचल जाहीर केलेली आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखाना हा टिकला पाहिजे, यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून निष्ठावान असणारे ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस गाळपासाठी पाठवत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom