ताज्या बातम्याराजकारण

फत्तेसिंह माने पाटील यांना डबडी म्हणणे मोहिते पाटील यांना महागाईत पडणार….

अकलूज नगर परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांनी टीकेला सुरुवात केली, माने पाटील यांनी शेवट केला…

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच अकलूज नगर परिषदेच्या निवडणूकीच्या रणधुमाळीत मोहिते पाटील यांनी टीकेला सुरुवात केली तर, माने पाटील यांनी टीकेला उत्तर देऊन शेवट केलेला आहे. फत्तेसिंह माने पाटील यांना डबडी म्हणून मोहिते पाटील यांना महागाईत पडणार, अशी माने पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्मातील मतदारांमध्ये चर्चा होती.

फत्तेसिंह माने पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच पद, अकलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पद, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद, अशा विविध पदांवर काम केलेले आहे. फत्तेसिंह दादा यांनी पदावर काम करीत असताना सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला अडचणीच्या काळात मदत केलेली आहे. त्यामुळे फत्तेसिंह दादांना मानणारे अकलूजमध्ये विशिष्ट जाती धर्मातील अनेक लोक आहेत. अकलूज मधील सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे अनेकांशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहेत. फत्तेसिंह दादा म्हणजे एक रांगडं व्यक्तिमत्व. शेती बरोबर गाई, म्हशी, घोडे, शेळ्या पालन केलेले आहेत. पूर्वीच्या काळी अकलूजमध्ये सोमवारी आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असत. त्यावेळी दादांच्या विश्वासावर अनेक जनावरांचे व्यवहार होत असत. गावातील व बाहेरच्या व्यापाऱ्यांना आपला हक्काचा माणूस म्हणून दादांकडे पाहिले जात असत. दादांनी कायम माणसं जोडलेली आहेत. दादांना मानणारा सर्व जाती धर्मातील मतदार आहे.

विजय चौकातील जाहीर सभेतून मोहिते पाटील यांच्याकडून फत्तेसिंह माने पाटील यांच्यावर टीका केलेली होती. या टीकेला माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. राजलक्ष्मी हंसराज माने पाटील व फत्तेसिंह माने पाटील यांनी टीकेला जोरदार जशास तसे उत्तर दिलेले आहे. माने पाटील यांना डबडी म्हणणे सर्व जाती धर्मातील व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना पटले नाही. त्यांनी मतदानाच्या दिवशी मतदानातून चित्र स्पष्ट केलेले आहे. टिकेमुळे माने पाटील परिवार व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व एकवटले. यामुळे फत्तेसिंह माने पाटील यांना डबडी म्हणणे मोहिते पाटील यांना महागाईत पडणार असल्याचे पडसाद उमटलेले निकालानंतरच कळणार आहेत, तोपर्यंत वेट अँड वॉच….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom