श्री यलम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत पै. विक्रम गायकवाड यलम्मा देवी चषक जिंकत चांदीची गदा व रोख रकमेचा ठरला मानकरी

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री यलम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान विक्रम गायकवाड याने यलम्मा देवी चषक जिंकत चांदीची गदा व रोख रकमेचा मानकरी ठरला. मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील जागृत देवस्थान श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले परंपरागत व भव्य कुस्ती मैदान मोठ्या उत्साहात आणि कुस्ती शौकिनांच्या प्रचंड गर्दीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जंगी मैदानाला सुरुवात झाली.
या कुस्ती मैदानाला मोहोळ तालुक्यातील दिग्गज नेत्यांची आणि पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांची मोठी उपस्थिती होती.
प्रथम क्रमांकाच्या लढती व मानकरी:
१ लाख रुपये इनाम कुस्ती:
(प्रथम क्रमांक) : हॉटेल साई सिद्धेश्वरचे मालक श्री. दयानंद गायकवाड यांच्यातर्फे ठेवण्यात आलेल्या इनामासाठी पैलवान विक्रम गायकवाड आणि धनराज गाडे यांच्यात झालेल्या लढतीत पैलवान विक्रम गायकवाड यांनी बाजी मारली व चांदीच्या गदेचा व एक लाख रुपये इनामाचा मानकरी ठरला
कै. बाबुराव आण्णा पाटील व अण्णा विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ हिंदकेसरी पैलवान समाधान पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाच्या या कुस्तीसाठी चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली.
याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची कुस्ती मैदानास विशेष उपस्थिती होती. युवा नेतृत्व व उद्योजक नानासाहेब गायकवाड, संभाजी चव्हाण, दयानंद गायकवाड, बाळासाहेब मुळे, किशोर खराडे, मधुकर पाटील, बबन लोमटे, संतोष तांबीले, मंगेश चव्हाण, दत्त काकडे, आकाश तांबीले, सागर नागणे, अमोल शिंदे यांच्यासह पंच कमिटीच्या वतीने अजिंक्यराणा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
हे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वी करण्यासाठी भीमराव मुळे, साहेबराव काकडे, रमेश गायकवाड, बाळासाहेब मुळे, शिवाजी पासले, राजाराम काकडे, नानासाहेब गायकवाड, हनुमंत पासले, बंडू मुळे, महादेव मस्के, भाऊ माळी व पैलवान वस्ताद ग्रामस्थ आणि पंचकमिटीने विशेष परिश्रम घेतले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



