राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार हनुमंतराव डोळस यांनी तालिका अध्यक्ष पद भूषवून माळशिरस तालुक्याची मान उंचावली होती…

स्वर्गीय आ. हनुमंतराव डोळस यांचा थक्क करणारा जीवनप्रवास.
माळशिरस (बारामती झटका)
डिसेंबर 2017 साली हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार हनुमंतराव डोळस यांची निवड केली होती. तालिका अध्यक्ष पद भूषवून माळशिरस तालुक्याची मान उंचावलेली होती. घटना खरोखरच तालुक्यासाठी नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासाठी भूषणावह असून याबाबत आ. हनुमंतराव डोळस यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन केले जात होते.
प्रामाणिकपणा आणि जिद्द या दोन गोष्टी माणसाच्या अंगी असल्या तर तो सहज यशाची शिखरे पादाक्रांत करतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार असलेले हनुमंतराव डोळस होय.

मोहिते-पाटील प्रती असणारी प्रामाणिक निष्ठा व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची विचारधारा यामुळे उंच शिखर गाठलेले यश अधोरेखीत करण्यासारखे आहे. माळशिरस तालुक्यातील अतिशय छोटे असणारे दसुर हे त्यांचे गाव. गावची लोकसंख्या अतिशय कमी असताना देखील त्यांनी विविध सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटविला. प्रामाणिक व निष्ठेने काम केल्यास फळ नक्की मिळते. या त्यांच्यातील दृढ आत्मविश्वासामुळे आयुष्याच्या वळणावर ते कधी थांबले नाहीत, कधी थकले नाव्हते.
अविरत परिश्रम करण्याची तयारी व आपल्यावर ज्यांनी विश्वास टाकला, त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी अविरत झटण्याची तयारी यामुळे दसुर गाव ते विधानसभेचे तालिका अध्यक्ष पद या यशोशिखरापर्यंत पोहोचले होते. दसुर सारख्या छोट्या गावात कार्यांची सुरुवात करुन अतिशय गरीब परिस्थिती असतानाही विधानसभेच्या तालिका अध्यक्ष पदापर्यंत पोहोचणे, हा खरोखरच थक्क करणारा जीवन प्रवास आहे. 2009 साली विधान सभेची मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदार संघ राखीव झाला. मोहिते पाटील बंधुच्या आशिर्वादाने हनुमंतराव डोळस हे आमदार झाले. मोहिते पाटील बंधुचे कर्तुत्व व या कर्तुत्वाला प्रामाणिक कार्यकत्यांची जी गरज होती, तो प्रामाणिकपणा व निष्ठा जपणारा माणुस हनुमंतराव डोळस हे असल्याने आमदारकीचा मुकुट हनुमंतराव डोळस यांच्या डोक्यावर लागला व तो त्यांना प्राप्त झाला. सोलापूर जिल्ह्यासाठी आ. हनुमंतराव डोळस यांना मिळालेले हे तालिका अध्यक्ष पद नेहमीच लक्षात राहीलेले आहे, नव्हे तर ते इतिहास अधोरेखीतही झालेले आहे, यामुळे तालुक्याची मान जी उंचावली त्याबद्दल आ. हनुमंतराव डोळस यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन केले जात होते. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर कायम स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांची आठवण माळशिरस तालुक्यातील मतदारांना व हितचिंतकांना येत असते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



