पंढरपूरी म्हैस खरेदीसाठी शेतकरी व गवळी समाजाला ५० टक्के अनुदान द्या

शिवा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…
पंढरपुर (बारामती झटका)
आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात अत्यंत देखणी असलेल्या पंढरपूरी म्हैशी असुन या म्हैसीचा सांभाळ करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. वैरण व पशुखाद्याच्या महागाईमुळे शेतकरी व गवळी समाजाचे या म्हैसी पालनाकडे दुर्लक्ष होत आहे.
विशेष करून गवळी समाज या म्हैसी सांभाळतो व जोपासना करतो, परंतु खर्चीक असल्याने परवडत नाही. त्यामुळे एकीकडे पंढरपूरी म्हैस जतन व्हावी यासाठी आपल्या सरकारचे पशुसंवर्धन खाते प्रोत्साहन देत असुन विविध उपाययोजना राबवत आहे. या म्हैसी खरेदीसाठी गोवा राज्य सरकार 50 टक्के अनुदान देत असुन याच धर्तीवर गवळी समाजासह शेतकऱ्यांना पंढरपूरी म्हशी खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान द्यावे व म्हैस पाळण्यासाठी पशुखाद्य व वैरणीसाठी अनुदान द्यावे व म्हैसीच्या दुधाला १०० रु. प्रती लिटर दर द्यावा, असे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवा संघटनेचे नेते राजु भिंगे, माऊली हळणवर, सचिन अंकुशराव, आमित साळुंखे, बंडु चव्हाण, विकास टाकणे आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



