माळशिरस नगर पंचायतीच्या विकासकामांच्या निधीबाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक कैलास महादेव वामन यांनी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना प्रभाग क्र. १ च्या विकासकामांच्या निधीबाबत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.
माळशिरस नगर पंचायतीचे नगरसेवक कैलास वामन यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत यांना दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मी (SC) राखीव प्रभाग क्र. १ मधुन नगरसेवक म्हणुन निवडुन आलेलो आहे. माझ्या राखीव असणाऱ्या प्रभागातील नागरीकांच्या मुलभुत सुख-सुविधा, रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता इत्यादीबाबत योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या निधी उपलब्ध करुन देणेबाबत अनेक वेळा सभागृहात अर्ज दिलेले आहेत. त्या अनुषंगाने अनेक कामांचे ठराव देखील मंजुर झालेले आहेत. तथापि, त्यापैकी अनेक कामांना निधी उपलब्ध झालेला नाही. तर काही कामांना निधी उपलब्ध झालेला होता. त्याचे ई-निविदा देखील काढण्यात आलेल्या होत्या. परंतु, राजकीय व्देषापोटी व राखीव प्रभाग असल्याकारणाने माझा निधी शुध्दीपत्रके काढुन माझे व नागरीकांचे संमतीशिवाय निधी अन्यत्र प्रभागांमध्ये वळविण्यात आला आहे.
माझे प्रभाग क्र. १ हा SC राखीव असुन देखील या प्रभागामध्ये एक रुपया सुध्दा निधी देखील आजतागायत दलित वस्ती सुधार योजनेच्या खर्ची टाकण्यात आलेला नव्हता व नाही. त्याचप्रमाणे माझे प्रभागास नियमानुसार येणारा माझे प्रभाग क्र. १ च्या हक्काचा असणारा जिल्हा नियोजन आणि विकास समिती (DPDC) चा निधी देखील आजतागायत माझे प्रभाग क्र. १ मध्ये एक रुपयाही खर्ची टाकण्यात आलेला नाही.
(SC) राखीव असणाऱ्या माझ्या प्रभाग क्र. १ मध्ये राहत असणाऱ्या नागरीकांना जाणीवपुर्वक त्यांना आवश्यक असणाऱ्या मुलभुत नागरी सुविधांपासुन राजकीय व्देषापोटी वंचित ठेवण्याचे काम माळशिरस नगरपंचायतीतील सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हे काम करीत आहेत. एक तर प्रभागातील नागरीकांना त्यांना त्यांच्या हक्काच्या मुलभुत सुख-सुविधा, प्रभागातील अंतर्गत रस्ते, स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी, अंतर्गत गटारी, स्ट्रेट लाईट, स्वच्छता इत्यादी देण्याचे दृष्टीने त्यांचे हक्काच्या असणाऱ्या सुविधा पुरविण्यासाठी सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे मी व समस्त नागरीक सन २०२२ पासुन पाठपुरावा करीत आलेलो आहे. तथापि सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हे प्रभाग क्र. १ बाबत कायम उदासिन असल्याचे स्पष्ट झालेले आहे. याउपर वरिष्ठ पातळीवरुन जो काही थोडा फार निधी प्रभाग क्र. १ मधील जनतेच्या हक्काचा मिळालेला होता. तो देखील राजकीय व्देषापोटी अन्यत्र प्रभागांमध्ये प्रभाग क्र. १ मधील जनतेस अगर लोक प्रतिनिधीस विचारात न घेता परस्पर वळवुन प्रभागातील जनतेवर अन्याय करण्यात येत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल आवास योजना अंमलात आणण्यासाठी व त्याचा लाभ सामान्य गोरगरीब लाभार्थ्यांना मिळवुन देण्याबाबत देखील प्रशासकीय यंत्रणेमध्ये उदासिनता दिसुन येत आहे. त्यामुळे आजही माळशिरस नगरपंचायतीमध्ये बहुतांशी नागरीकांना राहण्यासाठी स्वतःचे घर देखील उपलब्ध नाही. त्यामुळे सदर योजना प्रबळपणे राबविणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे व त्यामुळे सत्ताधारी व निद्रस्त असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा अधिकारी, कर्मचारी यांना झोपेतून जागे करण्यासाठी व माळशिरस मधील जनतेवर होत असलेल्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी तमाम माळशिरस नगरपंचायत हद्दीतील नागरीकांच्या वतीने लोकशाही मार्गाने एक दिवसीय धरणे आंदोलन गुरुवार दि. १८/१२/२०२५ रोजी आपले माळशिरस नगरपंचायत कार्यालयासमोर करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

सदर निवेदनाच्या प्रती, मा. नगर विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई, मा. प्रधान सचिव साो, नगरविकास नवि-२ मुंबई, मा. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचनालय वरळी मुंबई, मा. प्रादेशिक संचालक तथा विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे., मा. जिल्हाधिकारी साो सोलापुर, मा. जिल्हाधिकारी साो सोलापुर, नगरविकास शाखा-सोलापुर, मा. जिल्हा प्रशासन अधिकारी साो जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर, मा. पोलीस अधिक्षक साो, सोलापुर ग्रामीण, मा. पोलीस निरीक्षक साो, माळशिरस पोलीस स्टेशन ता. माळशिरस जि. सोलापुर, मा. नगराध्यक्ष साो, माळशिरस माळशिरस नगरपंचायत माळशिरस यांना देण्यात आल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



