खंडाळीतील शेतकऱ्यांचा जून पासून विद्युत पंप बंद, महावितरणाचा हलगर्जपणा; दीड एकर ऊस करपला…

खंडाळी (बारामती झटका)
खंडाळी, ता. माळशिरस येथील शेतकरी शरद भोसले यांचे रितसर कनेक्शन असून श्रीपुर रोड भोसले वस्ती येथे त्यांची शेती आहे. काळेवस्ती ट्रान्सफॉर्म वरून भोसले वस्ती येथील सात-आठ शेतकऱ्यांना शेती पंपासाठी विद्युत पुरवठा केला जातो. श्रीपुर रोड लगत पोलवरील जंप जळला असल्यामुळे बोरवेलमधील मोटार जूनपासून बंद आहे.
खंडाळीतील वायरमन सुरवसे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधल्यावर, तुमचे कनेक्शन महाळुंग-श्रीपुर मधून असल्यामुळे ते आमच्याकडे येत नाही. त्यांच्याशी आमचा काही एक संबंध नाही. तुम्ही श्रीपुर महावितरण कार्यालयाशी संपर्क करा. वायरमन, अधिकाऱ्यांना भेटा. या अगोदर जंप कोण बसवायचे, तेथून ते ३३ KV लाइन गेलेली आहे. त्यांचा परवाना घ्यावा लागेल. ती बंद करावी लागेल. (मी त्यांना सांगितले कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे राजू थोरात हे बसवत होते. परंतु राजू थोरात यांनी गेल्या वर्षीच काम सोडले आहे. त्यामुळे ते आता ही कामे करत नाहीत. दोन-चार दिवस थांबा, बघता येईल. तुम्हाला कधी वेळ आहे, अशी उत्तरे देतात.
सात महिन्यापासून विद्युत पंप बंद असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून त्याला जबाबदार असणाऱ्या योग्य ती कारवाई व्हावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी. (सुरवसे यांनी श्रीपुरचे वायरमन मंडले यांना दूरध्वनी केला असता त्यांनी सांगितले, शरद भोसले यांचे कनेक्शन खंडाळीतून आहे. महाळुंग-श्रीपुर हद्दीतील काळेवस्ती येथील ट्रांसफार्मवरून शेतीपंपास विजपुरवठा केला जात असला तरी आमचा संबंध नाही.) पावसाचे दिवस असल्यामुळे ऊस पिकाला त्यावेळी संजीवनी मिळाली. परतीचा पाऊसही भरपूर प्रमाणात झाला. बोअरवेलला पाणी असून सुद्धा विद्युत पंप बंद असल्यामुळे ऊस पूर्ण करपला आहे. – शरद भोसले (सर), खंडाळी
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



