शिराळमध्ये अस्थींचे वृक्षारोपणाने विसर्जन

स्वर्गीय भीमराव धोंडीबा टोणपे यांचा दशक्रिया विधी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे…
कुर्डूवाडी (बारामती झटका)
शिराळ, ता. माढा येथील भीमराव धोंडिबा टोणपे (वय ८३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या परिवाराने त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित न करता वृक्षारोपण करून आपल्या शेतातील झाडात विसर्जन केले. स्व. भीमराव धोंडिबा टोणपे यांचा दशक्रिया विधी पंढरपूर येथे होणार आहे.
भीमराव टोणपे हे कुर्डूवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय टोणपे यांचे चुलते होते. त्यांना दोन मुले, सुना, पाच मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

फलटण तालुक्यातील गुणवरे या गावी ३५ वर्षे वीजमंडळात उत्कृष्ट सेवा देऊन ते निवृत्त झाले होते. मृत्यूनंतर अस्थी विसर्जनाने नदी प्रदूषित होते, हाच विचार डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या परिवारातील सर्वांनी त्यांच्या अस्थी नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या शेतात विविध झाडे लावली व झाडांमध्ये विसर्जित केल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



