ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

पिलीव परिसरातील बिकट व कठीण रस्त्याचा प्रवास विकासकामांमुळे सुलभ होणार…

तलावाला नाव हत्तीबुडे मात्र, पाण्याचा अभाव जलपूजन झाल्यानंतर खरोखरच हत्ती बुडेल असा पाण्याचा साठा तयार झाला…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या शुभ हस्ते जलपूजन व विविध रस्त्यांचा भूमिपूजन समारंभ…

पिलीव (बारामती झटका)

पिलीव, ता. माळशिरस परिसरातील गेली अनेक वर्ष शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, शेतकरी, दुग्ध व्यवसायिक, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, गरोदर माता-भगिनी यांना पिलीव परिसरातील बिकट व कठीण रस्त्याचा अतोनात हालअपेष्टा करून प्रवास करावा लागत होता.

परिसरातील लोकांची अडचण पाहून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी अतुल नष्टे, अमीर मुलाणी ते अनिल पिसे रस्ता, महादेव मंदिर ते संतोष जाधव वस्ती रस्ता, माळशिरस रोड ते सुनील जाधव वस्ती रस्ता, विक्रम मोहिते ते कपने घर रस्ता अशा रस्त्यांना निधी मंजूर केलेला आहे. पिलीव येथील तलावाला हत्तीबुडे (जामदार तलाव) नाव मात्र, पाण्याच्या अभावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तलाव असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था होती. परिसरातील शेतकऱ्यांनी तलावात पाणी साठण्याची व्यवस्था करण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे मागणी केली त्याप्रमाणे प्रयत्न करून तलावामध्ये पाणी साठण्यासाठी निधी उपलब्ध करून प्रत्यक्षात एवढं पाणी साठलेलं आहे, खरोखरच हत्ती बुडेल असा पाण्याचा साठा तयार झालेला आहे.

पिलीव परिसरातील जनतेची अनेक दिवसाची रस्त्याची अडचण व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याकरता पिलीव परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन व जलपूजन समारंभ शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 09 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम होणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास पिलीव पंचक्रोशीतील भाजप व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे पिलीव ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom