अकलूजच्या 10 हजार जनतेने भाजपाला विजयीच केले आहे…

क्या हार में, क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही।
अकलूज (बारामती झटका)
अकलूज नगरपरिषद निवडणूक म्हणजे केवळ एक स्थानिक निवडणूक नव्हती; ती ७० वर्षांपासून चालत आलेल्या राजकीय सत्तेला थेट आव्हान देणारी लढाई होती. मोहिते पाटील यांची सत्ता, दहशत अशी होती गेल्या अनेक वर्षात इतर पक्षांनी तिथे प्रवेश करण्याचाही विचार केला नव्हता.
एक काळ असा होता की, अकलूजमध्ये भाजपला साधा बूथप्रमुख मिळणेही अवघड होते. कार्यकर्त्यांवर दबाव, भीतीचे वातावरण आणि सत्तेचा वापर करून विरोधकांना दडपण्याची परंपरा होती.
अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने मा. आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला.

एका बाजूला पैसा, ७० वर्षाची मक्तेदारी, दहशद, दबाव तर दुसरीकडे रामभाऊ सातपुते यांच नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही निवडणूक होती.
स्वतःला राज्याचे पुढारी समजणारे सगळे नेतेमंडळी त्यांचं कुटुंब अकलूजच्या गल्लीबोळात फिरत होतं.
जिथं भारतीय जनता पार्टी अत्यल्प प्रमाणात होती तिथं भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जवळपास १०,००० मते मिळली. ४ नगरसेवक भाजपचे निवडून आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकलूज मधील जनतेमध्ये दहशतीच वातावरण संपलं हाच मोठा विजय आहे.
अकलूजमध्ये आज भाजपने सत्ता मिळवली नसेल, पण भविष्यासाठी मजबूत पायाभरणी नक्कीच केली आहे. ७० वर्षांच्या सत्तेच्या विरोधात उभं राहणं आणि दहा हजार मतांपर्यंत मजल मारणं, ४ नगरसेवक निवडून आणणे हे रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाची ताकद आहे.
आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच पराभूत होत नसतो तो त्या निवडणुकीतून शिकत असतो पुढं चालत असतो. संघर्ष करत असतो.
“क्या हार में, क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही।”
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



