नातेपुते येथे शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरदबापू मोरे आणि शिवप्रसाद अर्बन बँकेच्या चेअरमन ऋतुजा मोरे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप चे आयोजन
नातेपुते (बारामती झटका)
शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, श्री सद्गुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवप्रसाद उद्योग समूह दहिगावचे अध्यक्ष शरदबापू मोरे आणि शिवप्रसाद अर्बन नातेपुतेच्या चेअरमन सौ. ऋतुजा शरद मोरे यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप चे आयोजन शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वा. शिवप्रसाद अर्बन, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
यामध्ये मोफत रक्त तपासणी, मणका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत कॅन्सर तपासणी, मोफत हृदयरोग तपासणी, ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, मोफत यूरोलॉजी तपासणी, लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट मोफत डोळे तपासणी, व मोफत चष्मे वाटप, तिरळेपणा, बुबुळ प्रत्यारोपण, पापणी पडलेले रेटिना, तसेच मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे, अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंट या आजारांच्या तपासणी व उपचारासाठी नोंदणी सुरू आहे. तरी पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



