क्रीडाताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंना साहिल आतार यांच्या वतीने क्रीडा किटचे वाटप

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेळापूर (मुली) येथील विद्यार्थिनींनी माळशिरस तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे. या विजयी संघाची पुढील फेरीसाठी म्हणजेच जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल विद्यार्थिनींचा उत्साह वाढावा व त्यांना पुढील स्पर्धेसाठी आवश्यक प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवानेते श्री. साहिल आतार यांच्या वतीने विजेत्या संघास क्रीडा किटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रजनीश बनसोडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करत, “खेळामुळे शिस्त, संघभावना व आत्मविश्वास निर्माण होतो. ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही मोठी झेप घ्यावी,” असे अमोघ विचार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रणजीत सरवदे यांनीही आपले विचार मांडताना विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्त्व अधोरेखित केले आणि शाळेला सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमास इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष श्री. सुनील साठे, शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सर, इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष श्री. अमोल मंडलिक यांच्यासह युवा नेते प्रदीप सरवदे, समाधान काळे, आहिल पठाण, अभिजीत गवळी, दयानंद वाघमारे , शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्या, शाळेतील सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सत्कारप्रसंगी बोलताना साहिल आतार यांनी, “ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास या मुली जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर नक्कीच यश मिळवतील,” असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्या पुढील वाटचालीस यश मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom