ताज्या बातम्याराजकारण

फलटण नगर परिषदेत गड आला पण, सिंह गेला संघटन कौशल्य व मितभाषी स्वभावाचे अशोकराव जाधव यांचा निसटता पराभव…

रणजीतसिंह व समशेरसिंह बंधूंनी फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत जुलमी व एकाधिकारशाही असणाऱ्या राजेगटाची सत्ता उलथून टाकली…

फलटण (बारामती झटका)

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगर परिषदेच्या चर्चेच्या व रंगतदार निवडणुकीत जुलमी व एकाधिकारशाही असणाऱ्या राजेगटाची सत्ता माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर बंधूंनी फलटणची सत्ता उलथून टाकलेली आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासह 19 नगरसेवक दैदीप्यमान मताधिक्याने विजय झालेले आहेत. मात्र, नाईक निंबाळकर घराण्याला 40 वर्ष प्रामाणिक व निष्ठावान असणारे अशोकराव जाधव यांचा निसटता पराभव झालेला आहे. गड आला पण सिंह गेला, असे फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत चित्र निर्माण झालेले आहे..

लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्याबरोबर 1986 ला समाजकार्यास सुरुवात केली. गेली चार ते पाच दशक लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे बरोबर काम करत असताना अनेक राजकीय पक्षांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. राजकीय जीवनास सुरुवात करताना प्रथम हिंदुरुदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना या पक्षाचा शाखा प्रमुख म्हणून काम, नंतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून संधी मिळाली. संधीचे सोने करून श्रीमंत रामराजे यांची एक हाती सत्ता असताना नगर पालिकेच्या निवडणुकीत 2001 साली प्रथम नगरसेवक पदाची संधी लोकनेत्यांनी दिली.

संघटन कौशल्य व मितभाषी स्वभाव, सर्वांच्या बरोबर मिळून मिसळून काम करणे आणि सतत लोकांच्या संपर्कात राहणे व लोकांच्या अडीअडचणींना रात्री अपरात्री कधीही धावून जाण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय नगरसेवक ठरले.

मलठणमधील त्यांचा लोकसंपर्क पाहता लोक त्यांना 24/7 नगरसेवक म्हणून ओळखतात. गेल्या 25 वर्षात लोकहिताची अनेक कामे लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर त्यांचे पश्चात खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर व विरोधी पक्षनेते श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात श्री. अशोकराव जाधव यांना यश आले.

मूलभूत गरजा जसे की पाणी, लाईट, गटार, स्वच्छता, रोड तसेच आरोग्य विषयीही रक्तदान शिबिर, डोळे तपासणी व चष्मे वाटप, आरोग्य तपासणी या कामातही अशोकराव जाधव यांचा हिरीरीने सहभाग होता.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गेली 23 वर्षे पायी वारी करणारा नगरसेवक म्हणून त्यांची वारकरी संप्रदायातही ओळख आहे. त्याच धर्तीवर लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर व खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सहकार्यातून मलठण येथे लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवनची भव्य वास्तू उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दरवर्षी 10,000 वारकऱ्यांना अल्पोपहार देण्याची प्रथा वारकरी भवन मार्फत फलटण तालुका वारकरी संघटनेचे सचिव श्री. केशवराव जाधव महाराज यांचे सहकार्याने चालू झाली.

अजून मलठणमधील पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे तो, सोडवण्यासाठी मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहण्याचे वचन अशोकराव जाधव यांनी मलठणकर जनतेला दिलेले आहे.
मलठणकरांचे अशोकराव जाधव (काका) यांना अनेक आशीर्वाद आहेत आणि त्याच जीवावर ते याही निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून प्रचंड मताने निवडून येतील, असा विश्वास प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केलेला होता. अशोकराव जाधव यांचा निसटता पराभव कायम मलटणकर लक्षात ठेवतील, अशी कडवी झुंज दिलेली होती. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगरपालिकेमध्ये कायम मार्गदर्शन व सहकार्य करणारे जिवाभावाचे बंधुतुल्य असणारे अशोकराव जाधव यांच्या कार्याची कायम आठवण राहणार आहे. निश्चितपणे त्यांच्या प्रभागामध्ये विकासाचा डोंगर उभा केला जाईल. विकासाचा डोंगर उभा करीत असताना अशोकराव जाधव सुद्धा सभागृहात उपस्थित असतील असाही राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom