बारामती तालुक्यात जिवंत सातबारा मोहिम टप्पा २ चे आयोजन – उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामती (बारामती झटका)
बारामती तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या काळात जिवंत सातबारा मोहिम टप्पा २ चे आयोजन कऱण्यात येणार आहे, या मोहीमेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत ७/१२ अद्ययावत करणे, यामध्ये एकुमँ नोंद कमी करणे, इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदरी घेणे, सातबाऱ्यावरील इतर अनावश्यक कालबाह्य नोंदी कमी करणे, रहिवास विभागातील तुकडेबंदीचे व्यवहार विनामुल्य नियमित करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे ही सर्व कामे विनामुल्य केली जाणार असून याकरिता कोणत्याही प्रकारच्या शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही.
नागरिकांनी अर्जासोबत संबंधित सातबारा आणि फेरफार संलग्न केल्यास नोंदी जोडव्यात, याकामी संबंधित महसूल मंडळातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज व संबंधित कागदपत्रे जमा केल्यास २६ जानेवारीपूर्वी नोंदी नियमितीकरण केले जाणार आहे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मोहिम स्वरुपात देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



