जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन

तरंगफळ (बारामती झटका)
मंगळवार दि. 23 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरंगफळ येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उपस्थित पालकांमधून सर्व सदस्य तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये श्री. शंकर सुखदेव तरंगे, सौ. सुप्रिया कालिदास नरळे, श्री. प्रशांत शरद साळवे, सौ. अर्चना विलास तरंगे, सौ. मनीषा विलास कांबळे, श्री. सागर अण्णासो तरंगे, श्री. विठ्ठल मल्हारी महानवर, सौ. स्वप्नाली लालासो साळवे, श्री. दिपक ज्ञानोबा कांबळे, श्री. सुधाकर शिवपुत्र गुत्तेदार, सौ. राधिका नितीन कोष्टी यांची सदस्यपदी, श्री. नागनाथ संपत साळवे यांची शिक्षणप्रेमी, सौ. अश्विनी सागर बोडरे यांची ग्रामपंचायत स्वीकृत सदस्य तसेच श्री. दामु दत्तू कांबळे यांची अध्यक्षपदी तर सौ. रुपाली अर्जुन साळवे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी गावातील सर्व पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच सरपंच श्री. नारायण तरंगे, मा. सरपंच श्री. सुजित तरंगे, महादेव उत्तमराव तरंगे, माजी उपसरपंच शशिकांत साळवे, सतीश कांबळे, अण्णा नरोटे, मनसे अध्यक्ष पप्पू पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास तरंगे, संतोष तरंगे, प्रशांत तरंगे, रणजीत पाटील, मारुती शिंदे, प्रदीप तरंगे, रमेश कांबळे, दुर्योधन कांबळे, अशोक तरंगे यांचे सह पालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, शिक्षक स्टाफ उपस्थित होते..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



