सदाशिवनगर येथे मोहिते पाटील गटाला भगदाड…

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य अर्जुन भीमराव धाईंजे यांचा भाजपमध्ये प्रवेश…
सदाशिवनगर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशजी महाजन, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी एसएनडी इंटरनॅशनल स्कूल, नातेपुते येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये सदाशिवनगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अर्जुन भीमराव धाईंजे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अर्जुन धाईंजे यांच्या पक्षप्रवेशाने सदाशिवनगर येथे मोहिते पाटील गटाला मोठे भगदाड पडलेले आहे..
सदाशिवनगर गावच्या जडणघडणीत अर्जुन धाईंजे यांचा सिंहाचा वाटा आहे. सरपंच असताना गावच्या अनेक विकासाच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या योजना राबवलेल्या होत्या. मोहिते पाटील यांच्या विरोधी गटामध्ये उभा राहून अर्जुन धाईंजे पंचायत समिती सदस्य झालेले होते. पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळातील व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेल्या होत्या. तालुक्यातील विरोधी गटातील राजकीय घडामोडीमध्ये मोहिते पाटील गटामध्ये अर्जुन धाईंजे गेल्या पाच वर्षापासून काम करीत आहेत.

माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांनी विकास कामातून माणसे जोडली. अनेक गावांमधून विधानसभेला लीड मिळालेले होते. सदाशिवनगर येथे सुद्धा भाजपला लीड मिळालेले होते. अर्जुन धाईंजे यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार असून मोहिते पाटील गटाला मोठे भगदाड पडलेले आहे. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन परिसराचा विकास करण्याकरता अर्जुन धाईंजे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश घेतलेल्याच्या निर्णयाचे समर्थकांमधून स्वागत केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



