ज्याला आईबाप कळाले तो, जग जिंकला – वसंत हंकारे

माळशिरस (बारामती झटका)
श्री समर्थ बहुउद्देशीय समाज सेवा संस्था संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व सुशीलाबाई फरांदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सोमवार दि. 29/12/2025 रोजी सकाळी विज्ञान प्रदर्शन व चित्र प्रदर्शन यांचे आयोजन केले होते. तसेच दुपारी प्रमुख वक्ते वसंत हंकारे यांच्या “न समजलेले आई वडील” या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते वसंत हंकारे यांनी, आजकालची पिढी ही व्यसनाधीन होत चालली आहे. तसेच माणुसकी, आपले आई-वडील यांना विसरत चाललो आहे. त्या अनुषंगाने मुलांना आपले आई वडील हे आपल्यासाठी काय करतात, याची जाणीव आपल्या व्याख्यानातून करून दिली. मुला मुलींना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव व्याख्यानातून करून दिली. त्यांचे नाव समाजामध्ये उंच करावे. ज्यांना आपले आई-वडील कळाले ते जग जिंकले, असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
विज्ञान प्रदर्शन व चित्र प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बी. आर. सी. चे तंत्रस्नेही प्रमुख भानवसे सर, विज्ञान प्रदर्शन परिक्षक प्रशांत कथले, मुलाणी सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बी. एस. शिंदे सर, सर्व संचालक मंडळ, माळशिरस शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व ग्रामस्थ, सर्व पालक वर्ग, आजी-माजी विद्यार्थी, प्रशालेचे मुख्याध्यापक, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, श्रीनाथ विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये माननीय श्री. वसंत हंकारे सरांचा सत्कार श्री. पांडुरंग शिंदे, ॲड. नितीन पिसे, श्री. प्रवीण केमकर, श्री. मनोज गायकवाड, श्री. प्रदीप हेळकर, श्री. सोमनाथ मस्के, श्री. शिवाजी धोंडीराम शिंदे (संस्थेचे संचालक), श्री. गणेश बोराटे दादा (संस्थेचे संचालक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. के. काळे, साळवे आर. बी. यांनी केले. तर आभार प्रदर्शन बी. बी काळे व आदट मॅडम यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



