मा. आ. आरोग्यदूत राम सातपुते यांनी सामाजिक कार्यकर्ते ऋषीप्रसाद बनसोडे यांचा सन्मान केला…

मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस ऋषिप्रसाद बनसोडे यांचा सन्मान, मैत्री जपणारा मैत्रीच्या दुनियेतील आदर्श व्यक्तिमत्व सुभाष सुज्ञे उर्फ हरीओम यांनी मैत्रीचे नाते जपले.
सदाशिवनगर (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी सदाशिवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषीप्रसाद बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर ओवाळ, अविनाश उर्फ नाना ओवाळ, विजयसिंह उर्फ नाना पालवे, ज्येष्ठ नेते दादासाहेब पालवे, संघर्ष ओवाळ, वाल्मीक ओवाळ, डॉ. सतीश पालवे पाटील, भाजपा नातेपुते मंडल उपाध्यक्ष हरिभाऊ पालवे पाटील आदींसह पुरंदावडे गावचे ग्रामपंचायत सदस्य, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

ऋषीप्रसाद बनसोडे यांनी सदाशिवनगर पंचक्रोशीत आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. नेहमी सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कामे करीत असतात. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, खाऊ वाटप, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम वाढदिवसाला करीत असतात. ऋषीप्रसाद बनसोडे यांनी समाजामध्ये अनेक मित्र आपल्या मैत्रीपूर्ण संबंधातून निर्माण केलेले आहेत. तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस ऋषिप्रसाद बनसोडे यांचा सन्मान मैत्री जपणारा मैत्रीच्या दुनियेतील आदर्श व्यक्तिमत्व सुभाष सुज्ञे उर्फ हरीओम यांनी मैत्रीचे नाते जपलेले आहे. अकलूज येथून गुलाबाचा हार आणून ऋषिप्रसाद यांचा सन्मान केलेला आहे. आपल्या मित्राला पेढा भरवून आरोग्य, धनसंपदा, दीर्घायुष्य व निरोगी जीवन लाभो अशी श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना करण्यात आलेली आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



