ताज्या बातम्यासामाजिक

वासुदेव महाराज शास्त्री त्याग आणि समर्पणाची गाथा – ह.भ.प. विजय महाराज खवले

वारकरी भूषण वैराग्यमूर्ती वासुदेव शास्त्रींची फलतुला.

वारकरी धर्म परिषद नियोजन समिती गठीत.

मोताळा ( बारामती झटका)

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा पंचप्राण असलेले वारकरी भूषण वासुदेव महाराज शास्त्री त्याग आणि समर्पणाची मूर्तीमंत गाथा आहे. त्यांच्या संस्कार आणि सहवासातूनच महाराष्ट्रामध्ये असंख्य कीर्तनकार प्रवचनकार सद्यस्थितीत किर्तीवंत झाले. त्यापैकीच मी एक आहे, असे मनोगत मुक्ताई फळाचे ह. भ. प. विजय महाराज खवले यांनी व्यक्त केले.

मार्चमध्ये वारकरी धर्म परिषद आणि ह. भ. प. वासुदेव महाराज शास्त्री यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मोताळा तालुक्यातील श्री नागेश्वर महाराज संस्थान या ठिकाणी दोन डिसेंबरला आयोजित बैठकीला संबोधित करताना खवले महाराजांनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी वारकरी धर्म परिषद, वारकरी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह बाबाजींचे शिष्य गण तसेच महाराष्ट्रातील नामवंत महाराज, प्रवचनकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत ह. भ. प. वासुदेव शास्त्री बाबाजींच्या प्रगट दिनानिमित्ताने त्यांची फलतुला करून त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी मंगल प्रार्थना नागेश्वरांच्या चरणी करण्यात आली.
वारकऱ्यांच्या समस्या आणि वेदनेवर फुंकर घालण्यासाठी दरवर्षीप्रमाणे वारकरी धर्म परिषदेचे आयोजन नियोजन करण्यासाठी संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

यामध्ये सर्वश्री ह. भ. प. निनाजी महाराज खोडके, सतीशचंद्र रोठे पाटील, अमोल महाराज वक्ते, प्रमोद महाराज बेलूरा, हरिभाऊ महाराज पिंपळखुटा, राहुल महाराज वाकेकर, जया महाराज, प्रमिलाताई सुशीर, सुरेखाताई निकाळजे, विठ्ठल महाराज निपाणा, भरत महाराज घुटे, राजू महाराज, निवृत्ती महाराज, प्रल्हाद राऊत महाराज आदींची वेगवेगळ्या समित्यांचे समिती प्रमुख म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उर्वरित समित्यांसाठी आठ जानेवारीला वाघजाळ आश्रम या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom