जळभावी गावचे माजी सरपंच बापूराव शिंदे यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश…

माजी आमदार राम सातपुते यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये श्रीराम बंगला निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यातील माजी सरपंच, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये श्रीराम बंगला निवासस्थानी जाहीर पक्ष प्रवेश करीत आहेत. जळभावी गावचे माजी सरपंच बापूराव शिंदे यांच्यासह गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आप्पासाहेब सुळ व युवा नेते उद्धव कोकरे यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला.


यावेळी मांडवे गटाचे नेते धर्मराज माने, कण्हेर गणाचे नेते आनंद शेंडगे सर, जळभावी तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते भानुदास चोरमले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निलकुमार राऊत, कचरेवाडी गावचे माजी सरपंच युवा नेते रामभाऊ कचरे, कण्हेर गावचे माजी सरपंच व धुरंदर नेते धनंजय माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



