महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्तीपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यातून जाणार….

माळशिरस तालुक्यातील ओसाड रानवडी भागातून मार्ग जात असल्याने या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे – मा. आमदार राम सातपुते.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हरकतीमुळे वळवण्यात आल्याने तो आता सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ४१ गावातून जात आहे. माळशिरस तालुक्यातील ओसाड रानवडी अशा भागातून जात असल्याने या भागाच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे. माळशिरस तालुक्यातून जात आहे. यामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे याचे आभार मानावे तितके कमीच आहेत, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी मत व्यक्त करून केंद्र व राज्य सरकारचे आभार मानलेले आहेत.
नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे सतत चर्चेत राहिला आहे. या मार्गाच्या सुरुवाती पूर्वीच शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या असतानाच काहींनी हा मार्ग आपल्या भागातून जावा अशा मागण्याही केल्या आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये बदल केल्याचे दिसत आहे. या बदललेल्या मार्गात सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील गावातून जात आहे.

बार्शी तालुक्यातील रातंजन, सर्जापुर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा.), दहीटने,या ६ गावातून तर मोहोळ तालुक्यातील तडवळे, वाळूज, भैरववाडी, देगाव, वाफळे, सिद्देवाडी, तेलंगवाडी, शेटफळ या ८ गावातून.
माढा तालुक्यातील धानोरे, मानेगाव, बुद्रुकवाडी, पंच फुलवडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव, मोडनिंब, बैरागवाडी, या ९ गावातून
पंढरपूर तालुक्यातील बार्डी, करकंब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, आवे या ७ गावातून.
माळशिरस तालुक्यातील जांबुड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी, गारवाड, या ११ गावातून हा रस्ता जात असल्याचे संभाव्य नियोजन असून यापैकी काही गावाचे गावनकाशे मागवण्यात आले आहेत.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग काम पूर्ण झालेले आहे. लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला सुरुवात झालेली आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्यापासून कायम वंचित असलेल्या निरा-देवधरच्या 22 गावांचा समावेश झालेला असल्याने पाण्याचा सुद्धा प्रश्न माजी आमदार राम सातपुते यांच्या सततच्या पाठपुराव्याने सुटलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला व माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नाला यश आलेले असून नागपूर गोवा शक्तिपीठ मार्ग सोलापूर जिल्ह्यांत बार्शी, माढा, पंढरपूर, मोहोळ व माळशिरस या तालुक्यांतून जात असल्याने माळशिरस तालुक्याच्या शक्तिपीठ मार्गाने दळणवळण उद्योग व्यवसायाला चालना मिळणार असून शक्तिपीठांचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



