मळोली येथील श्रीमती अंबुताई रामचंद्र जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे कर्मचारी राजन जाधव यांना मातृषोक…
मळोली (बारामती झटका)
मळोली, ता. माळशिरस येथील श्रीमती अंबुताई रामचंद्र जाधव यांचे वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 09/01/2026 रोजी सकाळी अल्पशा आजाराने उपचारादरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणीची पवित्रनगरी पंढरपूर येथील दवाखान्यात दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे कर्मचारी राजन जाधव यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर मळोली येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे.
श्रीमती अंबुताई जाधव यांना अंबूमावशी या टोपण नावाने ओळखत होते. अंबुताई यांचा सुसंस्कृत स्वभाव असून त्या मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. भावभावकी व शेजापाजारी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्या सर्वांशी प्रेमाने व आदराने वागत असत. कधीही डोक्यावरील पदर ढळू दिला नाही. लहान व थोर यांच्याशी बोलताना बोलण्यात गोडवा, आपुलकी, प्रेम होते.
त्यांचा रक्षाविसर्जन व तिसऱ्याचा कार्यक्रम रविवार दि. 11/01/2026 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.

स्व.अंबुमाऊशी यांच्या दुःखद निधनाने जाधव परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय अंबुताई यांच्या आत्म्यास शांती लाभो, हिच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



