सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील : अष्टपैलू व अलौकिक व्यक्तिमत्व

अकलूज (बारामती झटका)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची जयंती 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांती दिवशी अकलूज येथे मोठ्या विविध विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संपन्न होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व त्यांच्या पश्चात समस्त मोहिते पाटील कुटुंबीयांनी व त्यांचे सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी यांनी केवळ अकलूज व माळशिरसच तर सोलापूर जिल्ह्यासाठी गेल्या ७८ वर्षात ज्या भरीव व कायमस्वरूपी सुधारणा दिल्या व चौफेर विकास केला आहे तो केवळ अकलूज व माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशालाही माहित आहे. परंतु त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे पारायण व्हावे व त्यातून इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा व त्यांच्या ऋणातून थोडी तरी मुक्तता मिळावी या हेतूने हा लेख लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
अकलूज व माळशिरस तालुक्या बरोबरच सोलापूर जिल्ह्यात सहकार, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला,क्रीडा इत्यादी क्षेत्रात त्यांनी व समस्त मोहिते पाटील कुटुंबीयांच्या व सहकारी कार्यकर्त्यांच्या मदतीने विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र काम करून सर्वच क्षेत्रात चौफेर प्रगती केलेली दिसून येते. त्याचबरोबर उद्योग-धंदे , पर्यटन, व्यवसाय,व्यापार, वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला व प्रगतीला पूरक अत्याधुनिक सुविधा निर्माण करून अकलूज एक उत्कृष्ट मेडिकल हब, पर्यटन क्षेत्र व विख्यात बाजारपेठ म्हणून सोलापूर जिल्ह्यात अकलूजची ओळख निर्माण झाली आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अकलूजने नावलौकिक कमावलेला आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत: अकलूज
यशवंत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती
सदाशिवनगर येथील चितळे यांच्या खाजगी साखर कारखान्याची खरेदीत्व याचे शंकर सहकारी साखर कारखान्यात रूपांतर
कृषी उत्पन्न बाजार समिती
शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील शेतकरी सहकारी बँक
डी.सी.सी. बँक व भू-विकास बँकेच्या माध्यमातून शेती व उद्योगधंद्याला मोठ्या प्रमाणा कर्ज पुरवठा करून विकासात हातभार
जलसिंचन अंतर्गत तलाव बांधायचे काम, कालव्यांचे काम, बोअरवेल्स ,सामुदायिक विहिरी , वैयक्तिक विहिरींचे काम
वीर-भाटघर व उजनी धरणाचे पाणी माळशिरस तालुक्यात शेतीसाठी फिरून माळशिरसच्या ओसाड माळरानाचे ‘नंदनवनात’ रूपांतर केले.
ऊस, केळी, डाळिंब, द्राक्षे, आंबा इत्यादी उत्पादनात माळशिरस तालुका अग्रेसर
शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ
प्रताप क्रीडा मंडळ शंकर नगर
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना ऊस वाहतूक संघ
शंकरराव मोहिते पाटील सहकारी सूतगिरणी
राजहंस कुक्कुटपालन संघ
शिवकृपा कुक्कुटपालन उद्योजक सहकारी संघ
शिवपार्वती फलोत्पादक सहकारी संघ
विजयसिंह मोहिते पाटील दूध वाहतूक संघ
सुमित्रा नागरी सहकारी पतसंस्था
शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था व त्याच्यासह एकूण ७ शाखा
शैक्षणिक संस्थांचे जाळे
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज (१९४७)
शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, अकलूज (१९७५)
शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज(१९७९)
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान ,धवल नगर, अकलूज (१९९१)
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अंतर्गत शाखा
संस्थेचे पहिले मुलांचे वस्तीग्रह (१९४७) : विजय वस्तीगृह , अकलूज
संस्थेची पहिली शाळा: (१९४७):सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज
संस्थेचे पहिले महाविद्यालय (१९६७):
शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय , पदयुत्तर अभ्यासक्रम, इंग्रजी, मराठी व इतिहास विषयात एम. ए., इलेक्ट्रॉनिक्स व ऍग्रो केमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट विषयात एम. एससी. तसेच प्राणीशास्त्र ,वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, इतिहास ,भूगोल, इंग्रजी अर्थशास्त्र या ७ विषयात पीएच.डी.ची सोय उपलब्ध
महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालय, अकलूज
टेक्निकल हायस्कूल, शंकरनगर
कृषी तंत्र विद्यालय , अकलूज
दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान विद्यालय , अकलूज
रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला संकुल मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी स्वतंत्र कन्या शाळा
गृहविज्ञान महिला महाविद्यालय,
साडेसातशे सातशे मुलीची प्रवेश क्षमता असलेले महिला वस्तीगृह
रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज ( मुला मुलींचे वसतिगृह सुविधा उपलब्ध)
डी. फार्मसी. कॉलेज
फार्मसी कॉलेज
माळशिरस तालुक्यातील शेतकरी कामगार व मजुरांच्या मुलांची शिक्षणाची सोय त्यांच्या गावातच व्हावी या एकमेव हेतूने तालुक्यातील बहुतेक छोट्या छोट्या गावातही संस्थेने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुला- मुलीसाठी स्वतंत्र वस्तीगृहे सुरू केलेल्या आहेत.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोजक्याच शाळा तालुक्याबाहेर खालील शाळा पुणे व सातारा जिल्ह्यात आहेत.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळा, कोथरूड, पुणे
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील माध्यमिक शाळा ,कोथरूड ,पुणे
संत रामदास विद्यालय ,शिवथर घळी, जिल्हा सातारा
आज वरील शाखामधून लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले असून त्यांनी आपले जीवन समृद्ध बनवले आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील चारिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट अकलूज शाखा
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकर नगर ,अकलूज डिग्री इंजिनिअरिंग व डिप्लोमा इंजीनियरिंग स्वतंत्र महाविद्यालय असून दोन्ही महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिविल इंजीनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सायन्स अँड इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यास करून उपलब्ध आहेत. तसेच मुला मुलींच्या वस्तीगृहाची सोय उपलब्ध
शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट, शंकरनगर ,अकलूज अंतर्गत शाखा
ग्रीन फिंगर्स स्कूल ,शंकरनगर
ग्रीन फिंगर्स ग्लोबल स्कूल, खारघर ,मुंबई
ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर ,शंकरनगर
ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ,शंकरनगर
ग्रीन फिंगर्स कॉम्प्युटर कॉलेज शंकरनगर
शिवरत्न शिक्षण संस्था यशवंत नगर अकलूज अंतर्गत शाखा
शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शंकरनगर
शिवरत्न सी.बी.एस.ई. स्कूल ,शंकरनगर
शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल ,शंकरनगर
फ्री विंग्स ,अकलूज
विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, अकलूज
शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज
मदनसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालय , मंगळवेढा
विजयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, मंगळवेढा
शिवरत्न बॉईज हॉस्टेल, शंकरनगर
शिवरत्न गर्ल्स हॉस्टेल, शंकर नगर
सहकार महर्षी मोहिते पाटील प्रतिष्ठान संचलित शाखा
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते
प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा
प्रतापसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, अकलूज
वरील सर्व शैक्षणिक संस्था मधून लाखो विद्यार्थी शिकून विविध क्षेत्रांमध्ये सेवा देत आहेत.
पर्यटन क्षेत्र विकास
पर्यटनच्या दृष्टीने चालना मिळावी म्हणून अकलूज किल्ल्याचा जिर्णोद्धार व अत्याधुनिकरण व सुशोभीकरण
अकलूज किल्ला शिवसृष्टी निर्मिती
शिवपार्वती मंदिर ,शंकर नगर
सयाजी राजे वॉटर पार्क
शिवामृत गार्डन
भव्य अकलाई देवी मंदिर व परिसर विकास
अर्धनारी नटेश्वर मंदिर, वेळापूर
साईबाबा मंदिर
राम मंदिर
जैन मंदिर
एक मुखी दत्त मंदिर व अक्कलकोट स्वामी महाराज मंदिर
वरील सर्व मंदिराच्या ठिकाणी भक्ती निवास सुविधा उपलब्ध
अकलूज बाजारपेठ विकास
आत्ताचे डी- मार्ट येण्यापूर्वीच अकलूज १९९५ मध्ये शिवशंकर बझार सुरू करण्यात आले असून याचे मुख्य कार्यालय अकलूज येथे असून गांधी चौक, यशवंतनगर, वेळापूर, श्रीपुर, नातेपुते व पिलीव येथे अशा एकूण आठ शाखा असून त्याची वार्षिक उलाढाल 80 कोटी आहे. ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणी योग्य दरात मिळतात.
अकलूज बाजारपेठेतील टपऱ्या काढून त्या ठिकाणी ग्रामपंचायत अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यासारख्या संस्थांच्या मदतीने पक्के स्लॅबचे बांधकाम केलेले हजारो व्यापारी गाळे अत्यल्प भाड्यात उपलब्ध केले. माळशिरस तालुका व शेजारील इंदापूर, फलटण, सांगोला, पंढरपूर, माढा, मान इत्यादी तालुक्यातील लोकांसाठी अकलूजची बाजारपेठेत अगदी किरकोळ वस्तू पासून ते विविध ब्रॅण्डेड कंपनीच्या महागड्या गाड्याचे शोरूम उपलब्ध आहेत. बांधकामासाठी आवश्यक ते बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिक साहित्य प्लंबिंग साहित्य योग्य दरात उपलब्ध
बांधकाम करणाऱ्या कंपन्या, इंजिनियर्स, आर्किटेक्टस, इंटिरियर डिझायनर, इंटेरियर डेकोरेटर इत्यादी सेवा उपलब्ध
या बाजारपेठेच्या विकासासाठी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून आवश्यक तो कर्जपुरवठा सहज उपलब्ध
शेजारच्या तालुक्यातून अकलूजला यायला उत्तम रस्ते व वाहतूक व्यवस्था
अकलूज येथे शुद्ध पिण्याचे पाणी, निवास व भोजनासाठी उत्तम दर्जाचे हॉटेल्स
व्यापाऱ्यांना संरक्षण
मोठ्या प्रमाणात दरवर्षी होणारा घोडेबाजार देशभर प्रसिद्ध.
अकलूज : मेडिकल हब
ऍलोपॅथी आयुर्वेदिक व होमिओपॅथी इत्यादी प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणामध्ये अकलूज मध्ये उपलब्ध असून अनेक हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मनोरुग्णतज्ञ, अस्थिरोग तज्ञ,डेंटल सर्जन्स व सुसज्ज हॉस्पिटल्स यामुळे आता अकलूजचे मेडिकल हब म्हणून प्रसिद्धी झाली आहे तसेच अकलूज मध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध असतात व तयारी होतात.
बँका व पतसंस्था मार्फत गृह कर्ज हॉस्पिटल बांधकाम कर्ज मेडिकल स्टोअर टाकण्यासाठी कर्ज सहज उपलब्ध
सांस्कृतिक व कला क्षेत्रातील कार्य
कला व सांस्कृतिक विकासांतर्गत राज्यस्तरीय तमाशा परिषद स्थापना
राज्यस्तरीय तमाशा महोत्सव आयोजन
राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा
राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
विभागीय स्तरावर नृत्य स्पर्धा
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नृत्य, अभिनय, कला, क्रीडा, एन.एस.एस., एन.सी.सी. इत्यादी बाबत विशेष प्रशिक्षणाचे वेळोवेळी आयोजन त्यामुळे परिसरातील सैराट चित्रपटातील आर्ची ची भूमिका करणारी रिंकू राजगुरू स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत बहिर्जी नाईक यांची भूमिका करणारे अजय तपकिरे, सोमनाथ वैष्णव तसेच सेंट्रल युनिव्हर्सिटी सागर येथे नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून काम करणारे डॉ. अल्ताफ मुलाणी, चित्रपट दूरदर्शन मालिका व शॉर्ट फिल्म आणि जाहिरात दिग्दर्शक सहदेव घोलप, चित्रपट कलावंत योगीराज भिसे अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील ज्यांनी दूरदर्शन मालिका व चित्रपटांत नावलौकिक कमवले आहे.
संस्थेमध्ये शिकलेले अनेक तरुण तरुणी डॉक्टर, इंजिनियर, आयुक्त, उपजिल्हाधिकारी, पोलीस ऑफिसर्स यासारख्या उच्चपदी कार्यरत आहेत.
शासकीय क्षेत्रातील सुधार
पोलीस विभागीय कार्यालय
विभागीय प्रांत कार्यालय
स्वतंत्र आरटीओ विभाग,
बांधकाम कार्यालय
पाटबंधारे कार्यालय
जिल्हा सत्र न्यायालय, माळशिरस
अकलूज येथे अद्यावत पोलीस वसाहत
अशा प्रकारच्या विविध क्षेत्रात अनेक सुविधा निर्माण केले आहेत. सर्वांची यादी करणे या ठिकाणी शक्य होणार नाही म्हणून या ठिकाणी थांबतो. त्यांचे कार्य एखाद्या महासागराएवढे आहे. त्यातील एका थेंबाएवढेही मला माहित असलेले सांगता आले. उरलेले त्यांचे कार्य ज्याला माहित आहे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करावा.
ध्येयाने प्रेरित होऊन झपाटलेली व वेडी झालेली माणसे किती प्रकारचे काम करतात याचे हे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्यांनी समाजासाठी केलेल्या भरीव कामामुळेच तर त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात आणि हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. त्या कधीही पुसल्या जाणार नाहीत, म्हणूनच त्यांना लोक कधी विसरत नाहीत.
या लेखातून आजच्या पिढीतील इतर कार्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना व तरुण-तरुणींना प्रेरणा मिळावी व काही प्रमाणात का होईना अशा प्रकारचे काम त्यांच्या हातून भविष्यात व्हावे हा हेतूही या लिखाणामागे आहे.
अकलूजच्या सर्वांगीण विकासामुळे आज आलेली संपन्नता,समृद्धी व आधुनिकता या पाठीमागे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व माननीय आक्कासाहेब यांची कार्यप्रेरणा प्रोत्साहन व आशीर्वाद सतत चांगले कार्य करणाऱ्याच्या पाठीशी सतत असल्याची जाणीव होत असते, याचा मी स्वतः शंकरराव मोहिते महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून पंचवीस वर्षां पेक्षा अधिक काळ काम करत असताना अनुभवले आहे. हे या ठिकाणी मी अत्यंत नम्रपणे नमूद करू इच्छितो. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.

प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, पुणे
१४ फेब्रुवारी २०२६
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



