नातेपुते येथे आदित्य नर्सिंग होम यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त “दर्पण” पत्रकारिता पुरस्कार व विशेष आरोग्य शिबिर संपन्न.

नातेपुते (बारामती झटका
पत्रकार दिनाचे औचित्य साधून आदित्य नर्सिंग होम, नातेपुते यांच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच “दर्पण” पत्रकारिता पुरस्कार सन्मान सोहळा आज दुपारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.माळशिरस तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नातेपुते येथे आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील पत्रकार, डॉक्टर, लॅब टेक्निशियन, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली. पत्रकार समाजाचा आरसा असून, त्यांचे निर्भीड व प्रामाणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरते, या भूमिकेतून “दर्पण” पत्रकारिता पुरस्काराने कार्यरत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सन्मानित करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी AI तंत्रज्ञानावर आधारित eMedica डिवाइसद्वारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार अनुभव उपलब्ध करून देण्यात आला. बी.पी., शुगर, वेदना, ताणतणाव, झोपेच्या तक्रारी यांसह आरोग्याबाबत सखोल तपासणी करण्यात आली. नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित, सुलभ व परिणामकारक होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

दिवसाच्या दुसऱ्या सत्रात लॅब टेक्निशियन व डॉक्टरांसोबत वैद्यकीय क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, मेडिकल डिवाइसचे फायदे व भविष्यातील उपयोग यावर सखोल चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमात श्री मनोज महामुनी (Executive Director – eMedica, Pune) आणि श्री योगेश महामुनी (Director – MKGS Wellness, Pune) यांनी मार्गदर्शन करताना AI आधारित वैद्यकीय उपकरणांची भूमिका स्पष्ट केली.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री विशाल देशपांडे, डॉ. नरेंद्र कवितके (MD Physician) आणि डॉ. काजल कवितके (MBBS, DGO – स्त्रीरोग तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पत्रकारांच्या सन्मानासोबत आरोग्याची जबाबदारी स्वीकारणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



