ताज्या बातम्यासामाजिक

स्व. जगन्नाथ भगवान मोरे (आण्णा) यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम ह. भ. प. कबीर महाराज आतार यांच्या सुश्राव्य कीर्तनाने संपन्न

दहिगाव (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी स्व. जगन्नाथ भगवान मोरे (आण्णा) यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम बुधवार दि. 14/01/2026 रोजी श्रद्धाभावाने संपन्न झाला. यावेळी कीर्तनकार समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते शिवचरित्र व्याख्याते ह. भ. प. कबीर महाराज आत्तार यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले. ह. भ. प. कबीर महाराज आत्तार यांनी आपल्या कीर्तनाने उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले होते.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी, तसेच आप्तेष्ट, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्व. जगन्नाथ मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मान्यवरांनी कै. स्व. जगन्नाथ भगवान मोरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व कौटुंबिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देताना उपस्थितांची मने हेलावून गेली. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

सदर कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या धर्मपत्नी सौ. सोनियाताई गोरे, आ. उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर, माजी आमदार रामभाऊ सातपुते, अर्जुनसिंह मोहिते पाटील, सूर्योदय उद्योग समूहाचे श्री. बडोपंत लवटे, रियल डेअरी चे चेअरमन श्री. मनोज तुपे, उत्तमराव फडतरे, सौ. नीलमताई जाधव, श्री. अतुलदादा जाधव, संकल्प डोळस, आप्पासाहेब देशमुख, बाजीराव काटकर, बाबाराजे देशमुख, धैर्यशील देशमुख, राजाभाऊ देशमुख, ॲड. पिसाळ, माऊली पाटील, ॲड. भानुदास राऊत, मामासाहेब पांढरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कुटुंबीयांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मान्यवरांना भगवतगीतेचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आल्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom