सदाशिवनगर येथे सखी महिला मंडळाचा ऋतुजाताई मोरे यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न…

सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर, ता. माळशिरस येथील सखी महिला मंडळाचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन सौ. ऋतुजाताई शरद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सखी महिला मंडळाच्या
सौ. वंदना दीक्षित, सौ. सुनीता सोनटक्के, सौ. अनिता सुज्ञे, सौ. सुजाता पंडित, सौ. सारिका भोसले, सौ. भाग्यश्री राजमाने, सौ. सुनीता राजमाने, सौ. अर्चना सूर्यवंशी, सौ. मीनाक्षी माने, सौ. जयश्री बाळगे, सौ. सुनंदा इनामदार, सौ. विद्या नाळे, सौ. नीता रणवरे, सौ. प्रिती रणवरे, सौ. अमृता सोनटक्के, सौ. साक्षी सुज्ञे – ढवळसकर आदी महिला उपस्थित होत्या.
भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. इंग्रजी वर्षातील जानेवारी महिन्यात येणारा पहिला महिलांचा सण मकर संक्रांत आहे. संक्रांतीचा कार्यक्रम पंधरा दिवस सुरू असतो.
महिला एकमेकींना हळदीकुंकू व वाण भेट देत असतात. भेटीगाटीतून एकमेकींच्या विचाराची देवाण-घेवाण होत असते. महिलांना एकत्र आणणारा महिलांचा आवडता मकर संक्रांत सण असतो. अशा सणाचे औचित्य साधून महिला एकत्र येऊन साजरा करीत असतात…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



