ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरसमध्ये देवकाते पाटील यांच्यावतीने महिलांसाठी हळदी कुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम..

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. इंग्रजी वर्षातील जानेवारी महिन्यात येणारा पहिला महिलांचा सण मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम 15 जानेवारी पासून ते रथसप्तमी पर्यंत असतो. महिला एकमेकींना हळदीकुंकू व वाण भेट देत असतात. भेटीगाठीतून एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होत असते, सुसंवाद घडत असतो. महिलांना एकत्र आणणारा, महिलांचा आवडता सण मकर संक्रांत असतो.

अशा सणाचे औचित्य साधून महिलांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा असा उदात्त हेतू ठेवून सौ. साधनादेवी काशिनाथ देवकाते पाटील व सौ. श्वेतादेवी प्रितमसिंह देवकाते पाटील माळशिरस यांच्या वतीने हळदीकुंकू व वाण वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम माळशिरस नगरपंचायत रोड, हिमालय बंगला याठिकाणी संपन्न होणार आहे.

तरी माळशिरस नगरपंचायत हद्दीतील महिलांनी उपस्थित राहावे, असे देवकाते पाटील परिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom