ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज शक्ती प्रदर्शनमध्ये भरले जाणार….

चला फॉर्म भरायला विजयाची मुहूर्तमेड रोवायला… माळशिरस तालुक्यातील भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांना माजी आमदार राम सातपुते यांचे आवाहन…

माळशिरस (बारामती झटका)

स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज शक्ती प्रदर्शनमध्ये भरले जाणार आहेत. चला फॉर्म भरायला, विजयाची मुहूर्तमेढ रोवायला असे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे.. बुधवार दि. 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 09.30 वाजता श्रीराम निवासस्थान, 60 फाटा, मांडवे येथे उमेदवारांसह कार्यकर्ते एकत्रित येऊन तहसील कार्यालय माळशिरस येथे शक्ती प्रदर्शनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

माळशिरस तालुक्यात दहिगाव, कन्हेर, फोंडशिरस, संग्रामनगर, माळीनगर, बोरगाव, वेळापूर, निमगाव व पिलीव असे 09 जिल्हा परिषद गट आहेत तर गुरसाळे, दहिगाव, मांडवे, कन्हेर, भांबुर्डी, फोंडशिरस, मेडद, संग्रामनगर, माळीनगर, लवंग, जांभूड, बोरगाव, वेळापूर, यशवंतनगर, निमगाव, गोरडवाडी, पिलीव व तांदळवाडी असे 18 पंचायत समिती गण आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेच्या निसटत्या पराभवानंतर लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढवलेले आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन प्रत्येक नेते व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गट व गणाच्या उमेदवारी निश्चित केलेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom