माळशिरस तालुक्यात २१ उमेदवारी अर्ज दाखल

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद साठी ७ गटामधून ११ तर पंचायत समितीसाठी ७ गणामधून १०, असे २१ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली
मांडवे गटातून १, संग्रामनगर १, माळीनगर २, बोरगाव १, वेळापूर १, निमगाव २, पिलीव ३ असे ११ अर्ज दाखल झाले. तर पंचायत समितीसाठी गुरसाळे गणातून काल १ व आज २ असे तीन, कन्हेर २, फोंडशिरस १, मेडद १, यशवंतनगर १, गोरडवाडी १, पिलीव १ असे ७ गणातून १० असे आज अखेर २१ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याचा उद्या अंतिम दिवस असून अंतिम दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे व मतदार संघ
जिल्हा परिषद गट : पिलीव : धनाजी जाधव (महाराष्ट्र विकास सेना), गणेश पाटील (भाजप), चंद्रकांत जाधव (भाजप). वेळापूर : प्रेरणा खंडागळे (भाजप), निमगाव : संध्या ठवरे (भाजप), ज्योती ठवरे (भाजप), बोरगाव : महादेव साठे (महाराष्ट्र विकास सेना), माळीनगर : आनंद मिसाळ (महाराष्ट्र विकास सेना), ज्ञानेश्वर नाईकनवरे (महाराष्ट्र विकास सेना), संग्रामनगर : सुषमा नारनवर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), मांडवे : आनंद मिसाळ (महाराष्ट्र विकास सेना)
पंचायत समिती गण : गुरसाळे : दत्तात्रय शेळके (भाजप), नाथा रुपनवर (अपक्ष), कन्हेर : महादेव पवार (भाजप), आनंदराव शेंडगे, फोंडशिरस : काजल गोरे (भाजप), मेडद : युवराज झंजे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), यशवंत नगर : आनंद मिसाळ (महाराष्ट्र विकास सेना), गोरडवाडी : सुवर्ण देशमुख (भाजप), पिलीव : दीपाली नितीन मोहिते (भाजप)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



