मौजे चाकोरे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी

चाकोरे (बारामती झटका)
मौजे चाकोरे (ता. माळशिरस) येथील चाकोरे परिसरातील मारुती मंदिरात गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. या मंदिरात श्री मारुतीच्या मूर्तीबरोबरच श्री गणेशाची मूर्ती विराजमान असल्याने येथे गणेश जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे.
या मंदिरात दर शनिवारी हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, गणपती आरती, महादेव आरती, पांडुरंगाची आरती, श्रीराम आरती, हनुमान आरती तसेच संत बाळूमामांची आरती भक्तिभावाने संपन्न केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून येथे नित्यनेमाने अखंड हनुमान चालीसा सेवा सुरू असून या सेवेत तरुण, लहान बालगोपाल तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
दर शनिवारी सामूहिक हनुमान चालीसा पठणासाठी साधारण ५० ते १०० भाविक उपस्थित राहत असून गणेश जयंतीच्या दिवशी मौजे चाकोरे, प्रतापनगर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



