खुडूस गावचे सुपुत्र ॲड. श्री. सिताराम झंजे यांची जिल्हा परिषद सोलापूर पॅनल वरील माळशिरस पंचायत समिती विधीज्ञ पदी नियुक्ती…

ॲड. श्री. डी. ए. फडे यांच्याकडील पदभार ॲड. श्री. सीताराम धुळा झंजे यांच्याकडे हस्तांतर होणार…
माळशिरस (बारामती झटका)
खुडूस गावचे सुपुत्र ॲड. सिताराम धुळा झंजे यांची सोलापूर जिल्हा परिषद पॅनल वरील माळशिरस पंचायत समिती विधिज्ञ पदी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी नव्याने नियुक्ती केलेली आहे..
ॲड. श्री. डी. ए. फडे यांच्याकडे असणारा पंचायत समिती माळशिरस व अधिनस्त कार्यालयाकडील अभिरक्षेत्रील माननीय तालुका व वरिष्ठ स्तर न्यायालयीन प्रकरणाच्या सर्व मूळ अद्यावत (file) जिल्हा परिषद सोलापूर पॅनल वरील नवनियुक्त माळशिरस जिल्हा परिषद विधीज्ञ ॲड. श्री. सिताराम धुळा झंजे यांच्याकडे पूर्ण क्षमतेने हस्तांतरित करण्यात यावेत असे माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत…

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी दिलेल्या पत्रामध्ये संदर्भीय आदेशास व विषयास अनुसरून सन 2025-26 करता जिल्हा परिषद पॅनल वरती यापूर्वी आपली नियुक्ती करण्यात आलेली होती. परंतु, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आपले ऐवजी ॲड. श्री. सिताराम धुळा झंजे यांची सन 2025-26 करिता नियुक्ती केलेली आहे. तथापि माळशिरस येथील माननीय तालुका न्यायालय व वरिष्ठ स्तर न्यायालय येथील पंचायत समिती माळशिरस व अधिनस्त कार्यालयाकडील चालू व निकाली न्यायालयीन प्रकरणाच्या सर्व मूळ अद्यावत नस्त्या (file) या जिल्हा परिषद सोलापूर पॅनल वरील नवनियुक्त विद्यमान जिल्हा परिषद विधीज्ञ ॲड. श्री. सिताराम धुळा झंजे यांच्याकडे पूर्ण क्षमतेने हस्तांतरित करून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनास सहकार्य करावे. असे पत्र माळशिरस पंचायत समिती कार्यालयाकडून 5 जानेवारी 2026 रोजी ॲड. श्री. फडे यांना देण्यात आलेले आहे..
खुडूस गावातील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील ॲड. श्री. सिताराम धुळा
झंजे यांची सोलापूर जिल्हा परिषद पॅनलवर विधीज्ञ पदी निवड झाल्याबद्दल मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बारामती झटका परिवार यांचे कडून भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



