मल्हार साखर कारखान्यावर इन्कम टॅक्स आयुक्त हिमालय देवकाते पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न….

माळशिरस (बारामती झटका)
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी मल्हार साखर कारखाना चांदापुरी, ता. माळशिरस कारखाना स्थळावर राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रम भारत सरकार इन्कम टॅक्स मुंबई आयुक्त हिमालय देवकाते पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा मल्हार साखर कारखान्याचे चेअरमन काशिनाथरावजी देवकाते पाटील, समाजसेविका सौ. श्वेतादेवी प्रितमसिंह देवकाते पाटील, युवानेते शिवेंद्रराजे प्रितमसिंह देवकाते पाटील, चांदापुरी गावचे माजी सरपंच अंकुशराव पांढरे, कारखान्याचे मॅनेजर दत्तात्रय वाघमोडे, भगवानराव शिंदे, हरिभाऊ मगर कारखान्याचे अधिकारी नितीन लोंढे, ऋषिकेश इनामदार, अनिकेत गोपने, बापूराव ननावरे, ओंकार कदम, आझाद सय्यद, बापू तरंगे, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त हिमालय देवकाते पाटील यांनी ध्वजारोहण स्तंभाचे पूजन करून श्रीफळ वाढवला. सन्मानाने भारत देशाचा तिरंगा डौलाने फडकविला. यावेळी उपस्थित जनसमुदायांनी आनंदाने टाळ्या वाजवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली..


मल्हार साखर कारखाना स्थळावरील कर्मचाऱ्यांच्या महिलांना समाजसेविका सौ. श्वेतादेवी प्रितमसिंह देवकाते पाटील यांनी प्रजासत्ताक दिन व रथसप्तमी दिनाचे औचित्य साधून सुरतची साडी सप्रेम भेट देण्यात आली. प्रमुख अतिथी आयुक्त हिमालय देवकाते पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. उपस्थित सर्वांचे कारखान्याचे मॅनेजर दत्तात्रय वाघमोडे यांनी आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



