Uncategorizedताज्या बातम्या

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन झाले सज्ज…

सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी ऐवजी कारंडे ग्रामपंचायत हद्दीत पालखी सोहळ्याचा स्वागत समारंभ होणार

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व कारूंडे गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांच्यासह प्रशासन उपस्थित राहणार.

नातेपुते ( बारामती झटका )

कैवल्य साम्राज्य सर्वश्रेष्ठ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात सोमवार दि. ४ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वा. प्रवेश करणार आहे. दरवर्षी माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. मात्र, पालखी महामार्गाच्या विस्तारी करणाच्या कामामुळे सदर ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने पालखी विश्वस्त व सोलापूर जिल्हा प्रशासन यांनी कारूंडे ग्रामपंचायत हद्दीत कारूंडे बंगला या ठिकाणी माऊलीच्या पालखी सोहळ्याचा स्वागत समारंभ होणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन सज्ज झालेले आहे.

सदर पालखी सोहळा स्वागत समारंभासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई सातपुते, कारूंडे गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांच्यासह प्रशासनातील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालख्यांच्या स्वागतासाठी गेल्या महिन्यापासून पालखी सोहळा मार्गावर पालखी मुक्काम, न्याहारी, दुपारचा विसावा, रिंगण सोहळा अशा नगरपंचायत, नगरपरिषद व ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारकरी व भाविकांसाठी सुख सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची पळापळ सुरू होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी वेळोवेळी भेटी देऊन पालखी महामार्गांच्या अडचणी दूर केलेल्या होत्या. सोमवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व मंगळवारी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होत आहे. सर्व प्रशासन व स्थानिक नागरिक सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत.

पहिल्यांदाच माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत करण्याचा बहुमान मिळणार आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय फेर बदलामुळे दोन दिवसाचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या अधिवेशनातील वेळेनुसार ठरणार आहे. यंदाच्या वर्षी लोकप्रतिनिधी असणारे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, उपसभापती यांचा कालावधी संपलेला असल्याने कारूंडे गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांना पालखी महामार्गावर पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याचे मोठे भाग्य लाभणार आहे. कारूंडे बंगला येथे माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, विस्तार अधिकारी विठ्ठल कोळेकर, ग्रामविकास अधिकारी विलास सखाराम मोरे व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button