खंडाळी येथील ननवरे हायस्कूलमध्ये बाल दिंडी उत्साहात
खंडाळी (बारामती झटका)
ज्ञानगंगा बाल विकास मंडळ खंडाळी संचलित श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूल व सन्मती प्राथमिक विद्यालय खंडाळी ता. माळशिरस, जि. सोलापूर या शाळेची बालदिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये २५० हून अधिक मुलामुलींनी भाग घेतला होता. दिंडी गावातून नगर प्रदक्षिणा करून गावात आली.
संस्थापक अध्यक्ष सुभाष गांधी, सचिव श्रीमंत कानगुडे, स्वरूप गांधी, शितल गांधी यांनी बालदिंडीची पूजा करून उत्साहात स्वागत केले या दिंडीमध्ये असणारे विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, विणेकरी तसेच डोक्यावरती तुळस घेऊन असणाऱ्या लहान मुली, वारकरी वेशात असणारे बाल वारकरी यांचे ग्रामस्थ व पंढरपूरकडे जाणारे असंख्य वारकरी यांनी कौतुक करून दर्शन घेतले.

ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करणाऱ्या बालदिंडीने कॅनॉल जवळ विश्रांतीसाठी थांबलेल्या श्री संतराज महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी पालखी प्रमुख ह.भ.प. साठे महाराज व ग्रामस्थांच्या वतीने बालदिंडीला महाप्रसाद देण्यात आला. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाबरोबरच दिंडीमध्ये ‘राधा राधा कृष्ण राधा’ म्हणत मुलामुलींनी तसेच शिक्षिका यांनी फुगड्या खेळत दिंडीची शोभा वाढवली.
बालदिंडीचे आयोजन मुख्याध्यापक नानासाहेब वाघमोडे यांच्या सहकार्याने शरद भोसले, लतिका गोरे, महादेव साठे, वर्षा पताळे, रुक्साना तांबोळी, रेणुका साठे, स्मिता वाघे, संजय वाघमारे, संगीता गोसावी, संगीता ढोण यांनी केले. यावेळी मृदुंग साथ शिवछत्रपती भजनी मंडळ भोसले नगरचे विठ्ठल भोसले यांनी केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng