महाराष्ट्र शासनाच्या “सुंदर माझे कार्यालय अभियान” अंतर्गत माळशिरस तहसिल कार्यालयास प्रथम क्रमांक तर मंडळ अधिकारी अकलूज कार्यालयास द्वितीय क्रमांक
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र शासनाचे प्रशासन विभाग मार्फत दि.18/5/2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयांमध्ये “सुंदर माझे कार्यालय अभियान” हे अभियान आयोजित करण्यात आले.
सदर अभियानाचे मूळ उद्दिष्ट सामान्य नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या विविध कार्यालयीन सेवेमध्ये भौतिक व गुणात्मक बदल करणे आणि कार्यालयीन अधिकारी /कर्मचारी यांना दैनंदिन कामकाजाच्या दृष्टीने भौतिक संसाधने उपलब्ध करून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे असा आहे.
त्यास अनुसरून सोलापूरचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय यांना सदर स्पर्धेमध्ये दि. १५/०२/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या स्पर्धा कालावधीत सदर अभियानात सहभागी होऊन नमूद केलेल्या सर्व मुद्द्यांची पूर्तता करणे कामी सूचित केले.
त्यानुसार माळशिरस तहसिलदार श्री. जगदीश निंबाळकर यांनी सदर अभियान तालुक्यातील तहसिल कार्यालय, प्रत्येक मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयामध्ये राबविण्याच्या अनुषंगाने सुविधा निर्मिती करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. तालुक्याचे तहसिल कार्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालये असलेली मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे कार्यालयात अमुलाग्र बदल करण्याचे अनुषंगाने अभियान कालावधीत प्रयत्न केले गेले. यामध्ये नमूद केलेल्या लोकाभिमुख घटक जसे शासकीय कार्यालयामध्ये कार्यालय स्वच्छता, रंग रांगोटी, बैठक सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत पुरवायच्या सेवांची माहिती फलक, तलाठी यांचे शिवार माहितीचा कार्यक्रम इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचबरोबर कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये गुणात्मक सुधारणा करण्याचे अनुषंगाने कर्मचारी बैठक व्यवस्था, स्वतंत्र कपाटे, कर्मचारी यांचे आस्थापना विषयक प्रलंबित कामकाज पूर्ण करणे, लॅपटॉप/कॉम्प्युटर, प्रिंटर, नेट सुविधा स्वतंत्ररीत्या उपलब्ध करून देणे विषयक कामकाज अभियान कालावधीत पूर्ण करण्यात आले.
याकामी तहसिल कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी/तलाठी यांनी आपल्या कार्यालयाच्या बाबतीत पूर्ण क्षमतेने सदर अभियानाची अंमलबजावणी केली. त्याचेच फलित म्हणून अभियान कालावधीत केलेल्या कामकाजाचे विशेष पाहणी पथकाद्वारे केलेल्या पाहणी अंती मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांचे जिल्हास्तरीय समितीने तहसिल कार्यालय माळशिरस यास तहसिल स्तरावरील प्रथम पुरस्कार घोषित केला आणि मंडळ अधिकारी कार्यालय स्तरावरील द्वितीय पुरस्कार मंडळ अधिकारी कार्यालय, अकलूज यांना घोषित केला.
सदर पुरस्कार वितरण समारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते तहसिलदार माळशिरस श्री जगदीश निंबाळकर तसेच मंडळ अधिकारी अकलूज श्री. सी. एस. भोसले यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र वितरित करून गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर श्री. जगदीश निंबाळकर यांनी उक्त गौरव हा श्री. मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर, श्री. संजीव जाधवअप्पर जिल्हाधिकारी सोलापूर, श्रीमती शमा पवार निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर, श्री. अप्पासाहेब समिंदर, प्र. उपविभागीय अधिकारी, माळशिरस यांचे लाभलेले मार्गदर्शन आणि तहसिल, मंडळ, तलाठी स्तरावरील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे सहकार्य व प्रयत्नांचे फलित असल्याची भावना व्यक्त केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative and funny! For further reading, check out: DISCOVER HERE. What’s your take?