शेती महामंडळाच्या खोल्या पाडु नयेत म्हणून आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना निवेदन देण्यात आले
श्रीपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे श्रीपूर ऊस मळा अंतर्गत असलेल्या सर्व ऊस मळा अंतर्गत असलेल्या कर्मचारी यांचे निवासासाठी बांधलेल्या चाळी पाडण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय पुणे कार्यालयाकडून श्रीपूर कार्यालयाकडे पत्र आले आहे. सदर चाळीत शेती महामंडळाचे सर्व माजी कर्मचारी राहत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. वास्तविक पाहता गेली सत्तर वर्षे या चाळीत हे कर्मचारी राहत आहेत. त्यांच्या तीन पिढ्या वास्तव्यास आहेत.
सदर चाळी पाडू नयेत म्हणून विधानसभा आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना कामगार संघटनेचे पदाधिकारी भालचंद्र शिंदे पाटील, शंकर मोरे, आबा कांबळे व इतर पदाधिकारी यांनी लेखी निवेदन दिले आहे. आ. मोहिते पाटील यांनी मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सदर चाळी पाडू नयेत म्हणून विनंती करु, असे आश्वासन दिले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे श्रीपूर ऊस मळा युनिटचे सचिव भालचंद्र शिंदे पाटील यांनी दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng