Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा शिष्याकडून सन्मान

आई-वडिलांनंतर ज्ञानार्जन करणारे शिक्षक हे खऱ्या अर्थाने गुरु असतात, त्यामुळे गुरु शिष्याचं नातं निर्माण होतं.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

गुरुपौर्णिमेनिमित्त विजयसिंह मोहिते पाटील ज्युनियर कॉलेज, जाधववाडी विद्यालयातील शिष्य समाधान मिसाळ यांनी विद्यालयात जाऊन गुरूवर्य शिक्षकांचा सन्मान करून आशीर्वाद घेतला. यावेळी मुख्यध्यापक प्रा. नानासाहेब घार्गे सर, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. तुकाराम गोफणे सर, प्रा. शिवाजी माने सर, प्रा. अर्जुन कांबळे, प्रा. चव्हाण सर, प्रा. कुंभार सर, प्रा. ढगे सर, प्रा. वाघमोडे सर, प्रा. ज्योती जाधव मॅडम, प्रा. साधना पालवे मॅडम, प्रा. सचिता पाटणे मॅडम आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते.

समाधान मिसाळ यांनी विजयसिंह मोहिते पाटील ज्युनिअर कॉलेज जाधववाडी येथे शिक्षण घेतलेले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आई वडील हे आपले पहिले गुरु असतात मात्र, खऱ्या अर्थाने ज्ञानार्जन करणारे शिक्षक हेच गुरु असतात, असे समजून विद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला.

यावेळी त्यांनी गुरूंना पेढा भरवून तोंड गोड केले. गुरूंनीही शिष्याला पेढा भरवून गुरु शिष्याचे नाते द्विगुणीत केलेले आहे. समाधान मिसाळ यांनी शाळा सोडल्यानंतर सुद्धा गुरु-शिष्याचं नाते जपलेले असल्याने शिक्षकांच्या मनामध्ये शिष्याविषयी आपुलकी व प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button