वटपळी येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीदुतांचे कृषी प्रात्यक्षिक संपन्न
वटपळी (बारामती झटका)
वटपळी ता. माळशिरस येथे श्रीराम कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत ग्रुप, प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे माहिती देत आहेत. कृषी महाविद्यालयातील कृषिदुतांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना कृषी आवश्यक ॲप्लीकेशनचे मार्गदर्शन केले. जसे की ॲग्री मार्केट, बाजार भाव, ॲग्री बाजार, ॲग्मार्ट-मंडी इ. ॲप्लीकेशन शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून दिले. व त्या ॲप्लिकेशनचा वापर करून एखाद्या पिकाचा बाजारभाव कसा जाणून घ्यावा व हवामान अंदाज कसे पहावे हे सांगितले. जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांचे व्यवस्थापन योग्य रीतीने करता यावे, म्हणून महाविद्यालयातील कृषिदूत समर्थ कोरे, पवन निगुत, पवन ढवळे, रोहित भिंगारे, अटकळे तेजस,जीवन कोळेकर यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
त्यावेळी माजी उपसरपंच विष्णू घाडगे, अनिल वाघ, मीना पाटील, प्रवीण झुरळे, राजकुमार झुरळे, नारायण वाघ इ. प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हाके सर, कार्यक्रम अधिकारी डॉ. शेख मॅडम तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राऊत सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further reading, check out this link: READ MORE. Let’s discuss!