गोगलगाय उपद्रव व एकात्मिक नियंत्रण – सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी
माळशिरस (बारामती झटका)
पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत गोगलगाय पपई, केळी, वाल, दोडक्याचे वेल, वांगी, भेंडी, काकडीवर्गीय फळे, मिरची, पानकोबी, फुलकोबी व सर्वप्रकारच्या पालेभाज्या, सोयाबीन कापुस, ऊस रोपवाटीकेतील रोपे ऊगवून आलेली नवती यांचे पाने फुले कंद यामध्ये खाण्यासाठी छिद्र करतात. तसेच बीयापासून अंकुरीत कोवळे टोब यांना कुरतडतात, खातात. यामुळे उपद्रव होऊन तसेच कुरतडलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रार्दुभाव होऊन लहान रोपे मरतात. यामुळे लाक्षणीक उत्पादनात घट येते.

जमिनीवर व गोडया पाण्यात राहणाऱ्या गोगलगायच्या पंसतीस हजार प्रजाती आहेत. गोगलगायचा वापर युरोपात खाण्यासाठी कोंबडी खाद्य व विविध पदार्थ करण्यासाठी केला जातो. हिंदू धर्मात गोगलगायचे शंख पुजन व शंख नाद यासाठी महत्व आहे. गोगलगाय रात्रीच्या वेळी पिकाला उपद्रव करते व सुर्यादयानंतर लपून बसते. उत्पादनातील घट व मालाचा (भाजीपाला) दर्जा राखणेसाठी गोगलगायचा एकात्मिक प्रतिबंध खालील प्रमाणे करावा.

१ ) उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. २ ) पिवळट पांढऱ्या रंगाची शाबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. ३ ) शेताभोवती कॉफीची झाडे लावावीत. ४) शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत. ५ ) शेताभोवती २ मी. पट्टयात राख, मोरचूद व चुना यांचे मिश्रण पसरावे. ६ ) शेतामध्ये ७ ते १० मीटरवर वाळलेले गवत, पपईचा पाला, गोणपाट, कुजलेली लाकडे, भाजीपाला यांचे ढीग ठेवावेत. रात्रीनंतर सुर्यादयापूर्वी गोगलगाय या ठीगाखाली आश्रय घेतात. या ढिगाखालील गोगलगाय मीठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. ७ ) फळबागेतील उपद्रव टाळणेसाठी १०% बोर्डोपेस्ट बुंध्याला लावावी. ८) लहान गोगलगाय नियंत्रणासाठी मीठ ५% द्रावण फवारणीची शिफारस आहे. ९ ) कापूस, सोयाबीन पीकावरील गोगलगाय नियंत्रणासाठी मेलाल्डिहाईड २ किलो प्रतिएकर + १० लि. पाणी + २ किलो गुळ + २५ ग्रॅम यीस्ट + ५० किलो गव्हाचे काड १० -१२ तास भिजत घालून त्यामध्ये ५० ग्रैम थायमिथोक्झीन मिश्रण करून पट्टयात छोटे छोटे ढीग केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते.
तरी गोगलगायपासून होणाऱ्या १०% नुकसान व १००% भाजीपाला दर्जा व प्रत राखणेसाठी वरीलप्रमाणे एकात्मिक नियंत्रण उपाय अंमलबजावणीचे आवाहन तालुका कृषि कार्यालयाने केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
